आम्ही 'भारतीय जनते'चे मित्र आहोत - उद्धव ठाकरे

आम्ही 'भारतीय जनते'चे मित्र आहोत - उद्धव ठाकरे

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या मुखपत्रातून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या मुखपत्रातून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. यात उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणं भाजपवर सडकून टीका केली आहे. शिवसेना सत्तेत राहून विरोध का करते ? असा प्रश्न विचारला असता शिवसेना अंकुश ठेवायचं काम करते. आमचा पाठिंबा असो वा विरोध आम्ही जे पण काही केलं ते उघडपणे केलं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जेव्हा नोटबंदीने गोरगरीबांची विल्हेवाट लावली तेव्हा एकट्या शिवसेनेनं त्याच्या विरोधात आवाज उठवला.

नोटबंदीविरोधात बोलल्यामुळे तेव्हा शिवसेनेला देशद्रोही ठरवण्यात आलं. पण तेव्हा शिवसेनेनं आवाज उठवल्यामुळे आता सगळे जण मिळून यावर बोलतायत. त्यावेळी शिवसेनेनं आवाज उठवलेल्या मुद्द्यांवर आता सगळे जण भोगतायत आणि भोकतायत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षांवरही टीका केली आहे.

VIDEO : मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानावर सपत्नीक केली विठ्ठलाची पुजा

मुलाखतीत संजय राऊत यांनी विचारलं की,

संजय राऊत - तुमच्या मते विश्वास या शब्दाची व्याख्या कशी आहे. राजकारणात त्याला किती महत्त्व आहे.

उद्धव ठाकरे -  विश्वास खूप महत्त्वाचा आहे, पण विश्वासाला जागणारी पिढी आता राहिलेली नाही. माझ्यावर मा आणि साहेबांचे संस्कार आहेत. आजोबांनी सांगितलेला काळ वेगळा होता. तेव्हा एखादा शब्द दिला की दिला मग मागे फिरणं नाही. पाठ वळल्यानंतर पाठीत वार करणं ही जर निती असेल तर विश्वास नक्की कोणावर ठेवायचा असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला.

भाजप आणि शिवसेना मित्र पक्ष असले तरी मैत्री फक्त आम्ही मानतो. फक्त वाह...वाह नाही तर केलेल्या चुका परखडपणे मांडणारा खरा मित्र असतो. आता मी भाजप नाही तर भारतीय जनतेला मित्र आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजवर तोफ डागली आहे.

हेही वाचा...

...तर राहुल गांधीच पंतप्रधान होणार : काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका

आषाढी एकादशीला "अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर..."

Bigg Boss Marathi अभिनेत्री मेघा धाडे ठरली 'बिग बॉस'

 

First published: July 23, 2018, 8:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading