भाजप-सेनेच्या मेगाभरतीमुळे युतीत मोठा ट्विस्ट, असा असेल नवा फॉर्म्युला

भाजप-सेनेच्या मेगाभरतीमुळे युतीत मोठा ट्विस्ट, असा असेल नवा फॉर्म्युला

भाजप-सेनेत मुंबईत 4 ते 5 जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. तसंच शिवसेनेलाही नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी द्यायची असल्यानं दोन्ही पक्ष काही जागा बदलणार आहेत.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 10 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी  'युती'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अंतिम चर्चेला सुरुवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप जागावाटपात 20 ते 25 जागांची अदलाबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दोन्ही पक्षात झालेलं इनकमिंग आणि मागच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार जागा बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेत आता नवा ट्विस्ट आला असं म्हणायला हरकत नाही.

भाजपमध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या 10 ते 15 जणांना पक्ष उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजप-सेनेत मुंबईत 4 ते 5 जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. तसंच शिवसेनेलाही नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी द्यायची असल्यानं दोन्ही पक्ष काही जागा बदलणार आहेत. त्यामुळे आता कोणत्या जागेवर शिवसेनेचा गड असणार तर कोणत्या जागेवर भाजपचा हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातील इनकमिंग व्यतिरिक्त विद्यमान आमदारांच्या कामगिरीच्या निकषावरही उमेदवार बदलले जाऊ शकतात वडाळा विधानसभेत 2014 ला भाजपचा उमेदवार फक्त 700 मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, युतीत ही जागा परंपरागतरित्या शिवसेना लढवत होती. आता विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशामुळे ही जागा शिवसेना सोडण्याची शक्यता आहे.

सिल्लोडची जागा भाजपकडे असूनही विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आता ही जागा सेनेसाठी दिली जाऊ शकते. याच सूत्राप्रमाणे विद्या ठाकूर यांचा गोरेगाव, वैभव पिचड यांचा अकोले, संदीप नाईक यांचा ऐरोली,  राणा जगजीतसिंह यांचा उस्मानाबाद अशी मतदारसंघात अदलाबदल होऊ शकते.

इतर बातम्या - लय भारी! शेतकऱ्यांसाठी स्मार्ट प्रकल्प, एका क्लिकवर 13 योजनांचा लाभ

ज्याच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री-रामदास आठवले

येत्या विधानसभेत ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. तसंच भाजप पक्षालाच जास्त जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जागावाटपात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं, त्यासाठी उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल असं ही ते म्हणाले.

इतर बातम्या - मुंबईसह या जिल्ह्यांत 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस, काही गावांना पुराचा धोका!

युतीच्या इतिहासात शिवसेना पहिल्यांदाच होणार लहान भाऊ?

लोकसभा निवडणुकीत भाजपला देशासह राज्यात मोठं यश मिळालं. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजप नेतृत्वाने महाराष्ट्रात युती करताना तडजोड न करण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे शिवसेनेला लहान भावाची भूमिका स्वीकारावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये भाजपला 154 ते 159 जागा मिळतील तर दोन्ही पक्ष महायुतीतील मित्रपक्षांना प्रत्येकी 9 जागा सोडतील, असा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला 120 जागाच मिळणार आहेत. मात्र हा फॉर्म्युला शिवसेना नेतृत्वाकडून मान्य केला जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिलं होतं.

इतर बातम्या - चांद्रयान 2 : ISRO च्या 'विक्रम'ला NASA देणार मदतीचा हात?

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. तसंच मतदारसंघातील समीकरणं लक्षात घेत युती आणि आघाडीचा फॉर्म्युला तयार करण्यावरही भर देण्यात येत आहे. शिवसेना - भाजप युतीच्या जगावाटप वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याने भाजप लढणार असलेल्या मतदारसंघांचा या अहवालाच्या आधारावर आढावा घेतला जाणार आहे.

VIDEO: वंचित आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा, इतर टॉप 18 बातम्या

Published by: Renuka Dhaybar
First published: September 10, 2019, 12:07 PM IST

ताज्या बातम्या