मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

स्वबळावर विधानसभा लढण्याच्या तयारीत, शिवसेनेच्या 'या' मंत्र्याने केलं जाहीर!

स्वबळावर विधानसभा लढण्याच्या तयारीत, शिवसेनेच्या 'या' मंत्र्याने केलं जाहीर!

विधानसभा निवडणुकीत भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार अशी चर्चा एकीकडे सुरू असताना शिवसेनेला जर 144 जागा मिळाल्या नाही तर युती होणार नाही असं खळबळजनक वक्तव्यही दिवाकर रावते यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार अशी चर्चा एकीकडे सुरू असताना शिवसेनेला जर 144 जागा मिळाल्या नाही तर युती होणार नाही असं खळबळजनक वक्तव्यही दिवाकर रावते यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार अशी चर्चा एकीकडे सुरू असताना शिवसेनेला जर 144 जागा मिळाल्या नाही तर युती होणार नाही असं खळबळजनक वक्तव्यही दिवाकर रावते यांनी केलं आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar

सांगली, 26 सप्टेंबर:  शिवसेना-भाजपचं जागावाटपाचं गणित जुळलं असून युतीची 29 सप्टेंबरला अर्थात घटस्थापनेला घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण शिवसेना स्बळावर लढणार आणि सगळे उमेदवार निवडून आणणार असं शिवसेनेचे नेते दिवाकर रावते म्हणाले आहेत. सागंलीमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. शिवसेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून आम्ही यावेळी आमचं सामर्थ्य दाखवून देऊ आणि सगळे उमेदवार निवडून आणू असा विश्वास दिवाकर रावते यांनी बोलून दाखवला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार अशी चर्चा एकीकडे सुरू असताना शिवसेनेला जर 144 जागा मिळाल्या नाही तर युती होणार नाही असं खळबळजनक वक्तव्यही दिवाकर रावते यांनी केलं आहे. सांगलीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधामामुळे युतीत आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे.

या मेळाव्यादरम्यान, दिवाकर रावते यांनी कार्यकर्त्यांनाही चांगलंच खडसावलं. आपण शिवसेना पक्षातील आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला दक्ष असयला हवं. 11 च्या मेळाव्याला तुम्ही 12 वाजता उपस्थित राहिलात. मेळाव्याला उशिरा उपस्थित राहून मागे बसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात हार घाला असंही रावते म्हणाले.

दरम्यान, विधानसभेत शिवसेना लहान भावाची भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार आहेत. त्यामुळे जागावाटपात भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. उर्वरित जागा मित्रपक्षासाठी सोडण्यात येणार आहे. शिवसेना सोडून इतर मित्रपक्ष भाजपच्या 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.ॉ

इतर बातम्या - कारची ट्रकला भीषण धडक, अपघात 4 जण जागीच ठार

पाच जागांवर अडलं युती'चं घोडं

भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून जागावाटपाचा तिढा सुटण्यात जमा झाला आहे. शेवटच्या 11 जगांचा प्रश्न काही प्रमाणात सुटून तो आता फक्त 5 जागांच्या तडजोडीवर आला आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत 5 जागांचाही तिढा सोडवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती युती अभेद्य राहाणारच आहे, अशा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

या पाच जागांवर अडलं होतं घोडं

1) औसा, लातूर जिल्हा

2) वडाळा, मुंबई

3) एरोली, ठाणे

4) बेलापूर, ठाणे

5) उल्हासनगर, ठाणे

इतर बातम्या - परतीचा पाऊस आणखी 2 दिवस तुफान बरसणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा!

आधी होता 12 जागांवर तिढा

मागील विधानसभा निवडणुकीत गेल्या 25 वर्षांपासून अभेद्य असलेली शिवसेना-भाजपची युती तुटली होती. त्यानंतर राज्यात भाजपने आपली वाढलेली ताकद दाखवून देत 122 जागांपर्यंत मजल मारली. यंदा मात्र, दोन्ही पक्षांनी एकत्रिपणे विधानसभा निवडणुकांचा सामना करत आहेत. काही जागांवरून युतीचं घोड अडलं आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल तसंच विदर्भातील देवळी, रिसोड, गोंदिया आणि मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर आणि ठाण्यातील उल्हासनगर या जागांचा समावेश आहे.

इतर बातम्या - संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान, पुण्यात 5 जणांचा मृत्यू

दरम्यान, जागावाटपात 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम होता. भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. तरीही शिवसेनेला कमी जागा मान्य नव्हत्या. बदलती राजकीय परिस्थिती इतर पक्षांमधल्या नेत्यांचं भाजपमध्ये येणे. लोकसभेनंतर वाढलेली ताकद यामुळे जास्त जागा मिळाव्यात, अशा मागणीवर भाजप ठाम होता. अखेर भाजप मोठा भाऊ असल्याचे शिवसेनेला मान्य करावे, लागले आहे. भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार आहेत. उर्वरित जागा मित्रपक्षासाठी सोडण्यात येणार आहे.

हेल्मेट घालून आलेल्या तरुणानं झाडल्या एकामागोमाग गोळ्या, हत्येचा CCTV VIDEO

First published:

Tags: BJP, Chandrakant khaire, Cm devendra fadnavis, Shisena, Uddhav thackeray