छगन भुजबळांविरोधात शिवसेनेचा हुकमी एक्का मैदानात, निकाल बदलणार का?

छगन भुजबळांविरोधात शिवसेनेचा हुकमी एक्का मैदानात, निकाल बदलणार का?

2004 पासून येवल्यामध्ये छगन भुजबळांनी राष्ट्रवादीचा झेंडा रोवला आहे. जर 2019मध्येही छगन भुजबळ यांचा करिष्मा दिसला आणि ते जिंकून आले तर या जागेवर ते सलग 4 वेळा निवडून येणारे नेते ठरतील.

  • Share this:

येवला (नाशिक) , 01 ऑक्टोबर : माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला पूर्णविराम मिळाल्यानंतर आता येवल्यातून शिवसेनेनं संभाजी पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भुजबळ आणि पवार असा सामना यवल्यात रंगणार आहे. येवला विधानसभा मतदारसंघातून संभाजी पवार यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. यवला हा छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. गेल्या काही दिवसांआधी भुजबळ सेनेत प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचं भुजबळांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर आता सेनेनं संभाजी पवार यांना भुजबळांविरोधात लढण्यासाठी उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात 288 जागांवर निवडणुका पार पडणार आहेत. त्यातील येवला विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. 2004 पासून येवल्यामध्ये छगन भुजबळांनी राष्ट्रवादीचा झेंडा रोवला आहे. जर 2019मध्येही छगन भुजबळ यांचा करिष्मा दिसला आणि ते जिंकून आले तर या जागेवर ते सलग 4 वेळा निवडून येणारे नेते ठरतील.

हा विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्हा आणि डिंडोरी लोकसभा क्षेत्रात येतो. 2011च्या आकड्यांनुसार येवला मतदारसंघात 271146 लोकसंख्या आहे. येवला हा हातमाग उद्योगांसाठी ओळखला जातो. येथे एक हजाराहून अधिक हातमाग केंद्रे आहेत. येवल्यात रेशीम साड्या, गांधी टोप्या आणि पीतांबर बनवलं जातं. येवला विधानसभा मतदारसंघ नाशिकपासून 73 कि.मी. अंतरावर आहे.

येवला मतदार संघाचा इतिहास

२०१ च्या विधानसभा निवडणुकीत येवला विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ विजयी झाले होते. 2009 आणि 2004 मध्येही त्यांनी या विधानसभा जागेवर विजय मिळवला होता. 2014मध्ये छगन भुजबळ यांना एकूण एक लाख 12 हजार 787 मतं मिळाली होती. तर शिवसेनेचे उमेदवार संभाजी साहेबराव पवार यांना 66345 मतं मिळाली होती. त्यामउळे छगन भुजबळ यांचा 46442 मतांनी विजय झाला होता. भाजपचे उमेदवार शिवाजी माधवराव मनकर 9339 मतांनी तिसर्‍या क्रमांकावर होते. त्याचवेळी बसपाचे उमेदवार करभरी यांना केवळ 1101 मते मिळाली होती.

इतर बातम्या - एकाच दिवशी तिहेरी हत्याकांड, शिवसेना नेत्यासह 3 जणांचा खून

2014 मध्ये छगन भुजबळ 106416 मतं मिळवून विजयी झाले होते. त्याचबरोबर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेचे उमेदवार माणिकराव पाटील यांना 56236 मतं मिळाली. या जागेच्या इतिहासाबद्दल सांगायचं तर 2004 ते 2014 या काळात ही जागा छगन भुजबळांच्या ताब्यात आहे. 1995 आणि 1999 मध्ये शिवसेनेचे कल्याणराव जयंतराव पाटील विजयी झाले होते. 1990 मध्ये कॉंग्रेसचे उमेदवार मारुतीराव नारायण पवार  विजयी झाले होते.

छगन भुजबळांच्या मतदारसंघात शिवसेनेची वाढली ताकद म्हणून भुजबळांचं शक्तीप्रदर्शन

येवला मतदार संघात शिवसेनेची वाढलेली ताकद आणि स्वपक्षातून मिळणारे आव्हान त्यामुळे यंदाची निवडणूक छगन भुजबळ यांना पाहिजे तेवढी सोपी नाही, अशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी रविवारी येवल्याच्या ग्रामीण भागात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. निमित्त होते दरसवाडी,पुणेगाव या धरणातून कालव्याद्वारे येवल्याकडे आलेल्या पाण्याच्या जलपूजन कार्यक्रमाचे..

इतर बातम्या - शिवसेनेचं ठरेना! या मतदारसंघात उमेदवारांबाबत निर्णय नाहीच

छगन भुजबळ यांच्या सोबत यावेळी त्यांचा पुतण्या आणि माजी खासदार समीर भुजबळ, मुलगा आमदार पंकज भुजबळ आणि दोन्ही सुना देखील होत्या. गेल्या पन्नास वर्षांपासून दरसवाडी-पुणेगाव-डोंगरगाव पोहोच कालव्याच्या रखडलेले होते. कामाला छगन भुजबळ येवल्यातून आमदार झाल्यानंतर त्याला चालना मिळाली. भुजबळ यांनी मांजरपाड्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निर्मिती केल्यानंतर यंदाच्या पावसात मांजरपाड्यातून पूरपाणी वाहू लागले आहे. त्यामुळे दरसवाडी, पुणेगाव ही धरणे भरुन त्याचे पाणी कालव्यातून येवल्याकडे येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची वाट पाहणाऱ्या येवला तालुक्यातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी कालव्यातून आलेल्या पाण्याचे जलपूजनाचा कार्यक्रम छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे निमित्त साधून छगन भुजबळ यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधला.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 1, 2019, 9:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading