आदित्य ठाकरेंचा आमदारांसोबत मुक्काम तर उद्धव ठाकरेंची बैठक, सेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत?

आदित्य ठाकरेंचा आमदारांसोबत मुक्काम तर उद्धव ठाकरेंची बैठक, सेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत?

सध्या शिवसेनेच्या आमदारांना मालाड मढमध्ये 'द रिट्रीट हॉटेल'मध्ये ठेवण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनिवारी रात्रीपासून त्याठिकाणी शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आमदारांच्या भेटीसाठी गेले आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : सध्या राज्यात शिवसेना-भाजपमध्ये सत्तासंघर्ष अधिक वाढल्याचे पाहायला मिळतो. राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिल्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. सध्या शिवसेनेच्या आमदारांना मालाड मढमध्ये 'द रिट्रीट हॉटेल'मध्ये ठेवण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनिवारी रात्रीपासून त्याठिकाणी शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आमदारांच्या भेटीसाठी गेले आहेत. गजानन कीर्तिकर, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, अनिल देसाई हे शिवसेनेचे बडे नेतेदेखील काल रात्री उशिरा हॉटेलमध्ये आमदारांना भेटले.

एकीकडे आदित्य ठाकरे काल रात्रीपासून तळ ठोकून आहेत. तर आता उद्धव ठाकरे तिथे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज आमदारांची भेट घेण्यासाठी हाँटेलात रिट्रीटवर जणार आहेत. दुपारी 12:30 ला ते हॉटेलवर आमदारांची बैठकही घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापही भूमिकेवर ठाम असलेली शिवसेना आता भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे.

या सगळ्यामुळे पुढे काय घडामोडी घडतात हे पाहनं औस्तूक्याचे ठरणार आहे. शिवसेनेचे सर्व आमदार मालाडमधील एका हॉटेलमध्ये आहेत. काल त्या सर्व आमदारांची शिवसेना नेते रामदास कदम, मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतली. घोडेबाजाराच्या भितीनं शिवसेनेनं सावध पावलं उचलली आहेत. सर्व  आमदारांवर शिवसेनेची करडी नजर आहे.

शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत?

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्या आणि ठरल्याप्रमाणे करा अशी ठाम भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे. तर आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. शिवसेना बहुमत सिद्ध करेल असा स्पष्ट दावा संजय राऊतांकडून वारंवार करण्यात आला. असं असताना शविवारी सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपला निमंत्रण देण्यात आलं. यावेळी बोलताना आमच्याकडे 18 अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

भाजपकडे एकूण संख्याबळ 105 आहे. त्यात 18 अपक्षांचा पाठिंबा म्हणून 123 आमदर भाजपकडे आहेत. तर बहुमत सिद्ध करण्यासाठी 22 आमदारांची गरज असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. आता यात भाजप बहुमताच्या आकड्यांचा खेळ कसा खेळणार? शिवसेनेचा भाजपला पाठिंबा मिळणार का? असे प्रश्न आता उपस्थित होतात.

काँग्रेसचे आमदार जयपूरला रवाना

फूट टाळण्यासाठी राज्यातील काँग्रेस आमदारांना जयपूरला हलवण्यात आलं आहे. सर्व 44 आमदारांचा जयपूरमध्ये मुक्काम असून इथं बैठकांचं सत्र सुरु आहे. महाराष्ट्र कॉंग्रस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदारांशी चर्चा केली. बैठकांचं हे सत्र आजही सुरू राहणार आहे. यासंबंधी विचारलं असता आमच्या मित्रांना भेटायला जयपूरला आलो आहोत असं मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलं.

इतर बातम्या - चाकूचे 3 वार आणि मैत्रीचा 'दी एन्ड', दोस्तानेच केली तरुणाची निर्घृण हत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 09:46 AM IST

ताज्या बातम्या