मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /शिवसेनेत खळबळ! आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण, अधिवेशनालाही होते उपस्थित

शिवसेनेत खळबळ! आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण, अधिवेशनालाही होते उपस्थित

प्रत्येक राजकीय पक्षातील दिग्गजांना कोरोनाची लागण झाली आहे. अशाता आता शिवसेनेच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्रत्येक राजकीय पक्षातील दिग्गजांना कोरोनाची लागण झाली आहे. अशाता आता शिवसेनेच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्रत्येक राजकीय पक्षातील दिग्गजांना कोरोनाची लागण झाली आहे. अशाता आता शिवसेनेच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई, 10 सप्टेंबर : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना अनेक राजकीय नेते ते सेलिब्रिटीपर्यंत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांपासून, नर्स, सफाई कामगार, पोलीस ते राजकारण्यांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्षातील दिग्गजांना कोरोनाची लागण झाली आहे. अशाता आता शिवसेनेच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवनेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. किणीकर हे अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात उपचरार्थ दाखल करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात किणीकर यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी झाली नियुक्ती होती.

मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी नाशिकमध्ये, 3 दिवसांत आक्रमक आंदोलनाचा इशारा

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्या अधिवेशनाला किणीकर उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे या पावसाळी अधिवेशनात किणीकर यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. दरम्यान सोमवार आणि मंगळवारी अधिवेशनाला उपस्थिती लावल्यानंतर त्यांना अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. यावेळी केईएम रुग्णालयात कोरोना चाचणी केली असता रात्री त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

पुणे हादरलं! मॉलमध्ये जातोय सांगून नेलं लॉजमध्ये, वारंवार केले युवतीवर बलात्कार

यानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यासंबंधी त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. त्यांची तब्येत स्थिर असून घाबरण्याचे कारण नाही. त्यामुळे मतदारसंघातील कोणीही काळजी करू नये. सर्व कार्यकर्त्यांनी आणि मतदारसंघातली सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन किणीकर यांनी केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Lockdown