Mahashivratri : पाकिस्तानातलं शंकराचं असं मंदिर जिथे पाक पंतप्रधानही होतात नतमस्तक

Mahashivratri : पाकिस्तानातलं शंकराचं असं मंदिर जिथे पाक पंतप्रधानही होतात नतमस्तक

या मंदिराची ख्याती इतकी मोठी आहे की खुद्द पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीदेखील या मंदिरात जाऊन शंकराचं दर्शन घेतलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मार्च : आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. शंकराचं दर्शन घेण्यासाठी भारताच्या काना-कोपऱ्यात अनेक मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. असंच शंकराचं दर्शन घेण्यासाठी पाकिस्तानच्या एका मंदिरातही गर्दी होते. एक असं मंदिर जिथे पाकिस्तानातले नागरिक नतमस्तक होतात.

या मंदिराची ख्याती इतकी मोठी आहे की खुद्द पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीदेखील या मंदिरात जाऊन शंकराचं दर्शन घेतलं आहे. हे 'कटासराज मंदिर' पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे.

कटासराज मंदिर पाकिस्तानच्या चकवाल जिल्ह्यात आहे. या मंदिराजवळ एक प्रसिद्ध झरा आहे. या ठिकाणी आधी अनेक देवी-देवतांची मंदिरं होती असं इथली अख्यायिका आहे. पण आता इथे फक्त शंकर, राम आणि हनुमानाचं मंदिर आहे.

कटासराज मंदिराची पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, देव शंकर आई सती यांच्या अग्नी समाधीमुळे खूप दु:खी झाले होते. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील अश्रू दोन ठिकाणी पडले. त्यांच्या डोळ्यातील पहिला अश्रू ज्या ठिकाणी पडला त्याठिकाणी कटासराज सरोवर निर्माण झालं आणि दुसरा अश्रू ज्या ठिकाणी पडला तिथे पुष्कर तलावाची निर्मिती झाली. हा पुष्कर तलाव राजस्थानमध्ये आहे.

First published: March 4, 2019, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading