मुंबई, १९ फेब्रुवारी २०१९- जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्साहात साजरी केली जात आहे. शिवजयंती निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मिरवणुका काढल्या जात असून अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत.
लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यंत आणि सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाच्या मनात शिवराय आहेत. याचाच प्रत्यय बॉलिवूड स्टार अभिनेता रितेश देशमुखच्या इन्स्टाग्राम पोस्टने आला. शिवजयंती निमित्त रितेशने शिवाजी महाराजांचं चित्तवेधक चित्र काढलं.
चित्र काढतानाचा आणि शिवजयंतीच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडिओ रितेशने शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना रितेश म्हणाला की, ‘जगभरातल्या शीवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून हा एक विश्वास आहे. हा एक विचार आहे. हा विचार प्रत्येक मराठी माणसामध्ये जगलाच पाहिजे. जय हिंद.. जय महाराष्ट्र..’
रितेशच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो टोटल धमाल या सिनेमात दिसणार आहे. धमाल सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. याआधीच्या धमाल आणि डबल धमाल या दोन्ही सिनेमातून रितेशने प्रेक्षकांना हसवलं होतं. इंद्र कुमार यांचं दिग्दर्शन असणारा हा सिनेमा येत्या २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. मल्टिस्टारर या सिनेमात रितेशसोबत अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अर्शद वारसी यांसारखे तगडे कलाकार पाहायला मिळतील.
VIDEO : शिवरायांची भव्यदिव्य रांगोळी साकारणाऱ्या सौंदर्यासाठी आई-वडिलांनी दागिने ठेवले गहाण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Riteish Deshmukh, Riteish deshmukh drawing, Riteish deshmukh movies, Riteish deshmukh news, Shivjayanti, Shivjayanti 2019