'SHIVDE I AM SORRY' म्हणणं पडलं महाग, होऊ शकतो ७२ हजारांचा दंड

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी!’ चे एक दोन नव्हे तर तब्बल ३०० बॅनर लावले आहेत

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी!’ चे एक दोन नव्हे तर तब्बल ३०० बॅनर लावले आहेत

  • Share this:
    पुणे, १८ ऑगस्ट- प्रेयसीला मनवण्यासाठी प्रेमवीर एक से बढकर एक शक्कल लढवतात. पिंपरीतील अशाच एका मजनूने प्रेयसीची माफी मागण्यासाठी वेगळा मार्ग निवडला. प्रियकराने पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी!’ चे एक दोन नव्हे तर तब्बल ३०० बॅनर लावले आहेत. हे बॅनर पाहून पोलीसही चक्रावले. तपासानंतर प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने हा प्रताप केल्याचे उघड झाले आणि पोलिसांनीही डोक्याला हात लावला. पोलिसांनी या बॅनर लावणाऱ्याचा तपास सुरू केला. नीलेश खेडकर (२५) या मुलाने आपल्या प्रेयसीची माफी मागण्यासाठी आदित्य शिंदे या मित्राला हे बॅनर लावायला सांगितल्याचे समोर आले. मित्राच्या मदतीला धावून येत आदित्यने लहान- मोठे असे तब्बल ३०० फलक रस्त्यांवर लावले. नीलेश प्रेयसीला शिवडे या टोपण नावाने हाक मारतो. याच नावाचा वापर करुन नीलेश आणि आदित्यने ‘शिवडे आय अम सॉरी’चे फलक लावले. येणारे- जाणारेही हे फलक पाहून आश्चर्यचकित झाले. अनेकांनी तर सोशल मीडियावर या बॅनरचे फोटो व्हायरल केले. आता या प्रेमवीराला त्याच्या ‘शिवडे’कडून माफी मिळणार का अशी चर्चाही रंगली आहे. ७२ हजारांचा दंड बसू शकतो या प्रेमवीराला प्रेयसीकडून माफी मिळो न मिळो पण बेकायदा बॅनरबाजी केल्यामुळे ७२ हजारांचा दंड बसू शकतो. शिवाय हे प्रकरण अद्याप पोलिसांनी सोडलेले नाही. वाकड पोलीस त्याचा अधिक तपास घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या तपासातून आणखी काय बाहेर पडते याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
    First published: