शिवाजीपार्कवर उभारलेला मंडप कोसळून 3 भीमसैनिक जखमी

शिवाजीपार्कवर उभारलेला मंडप कोसळून 3 भीमसैनिक जखमी

शिवाजीपार्क मैदानात आंबेडकरवादी अनुयायासाठी बांधलेला मंडप कोसळलाय. या अपघातात 3 भीमसैनिक जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. उद्या 6 डिसेंबर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून लाखो अनुयायी दर्शनासाठी चैत्यभूमीवर दाखल झालेत.

  • Share this:

05 डिसेंबर, मुंबई : शिवाजीपार्क मैदानात आंबेडकरवादी अनुयायासाठी बांधलेला मंडप कोसळलाय. या अपघातात 3 भीमसैनिक जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. उद्या 6 डिसेंबर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून लाखो अनुयायी दर्शनासाठी चैत्यभूमीवर दाखल झालेत.

पण ओखी वादळामुळे मुंबईत आलेल्या पावसाने शिवाजी पार्क परिसरात सर्वत्र चिखल झालाय. म्हणूनच बीएमसीने तिथं भीमसैनिकांना निवारा म्हणून तात्पुरते मंडप उभारले होते. पण त्यापैकीच एक मंडप ओलाव्यामुळे कोसळलाय. त्यामुळे पालिकेला भीमसैनिकांसाठी आता इतरत्र निवाऱ्याची सोय करावी लागणार आहे. दरम्यान, आज सकाळीच बीएमसीने शिवाजी पार्क परिसरातल्या काही शाळा भीमसैनिकांच्या निवाऱ्यासाठी उपलब्ध करून दिल्यात.

आंबेडकर अनुयायींसाठी राहण्याची सोय इथे केलीय -

* आंबेडकर भवन, वरळी.

* छबीलदास हाइस्कूल , दादर *

* वरळी BDD क्रमांक 1 व 2*

* आदर्श हाइस्कूल, वरली कोळीवाडा *

* वूलन मिल BMC स्कूल , माटुंगा *

* गोखले BMC स्कूल , दादर *

* वरळी मायानगर जेतवन बुद्ध विहार *

* खेडगल्ली*

* धारावी लेबर कॅम्प *

* वरळी नाका BMC स्कूल *

* वरळी रमाई नगर*

* आंबेडकर शाळा, वरळी*

* सुभेदार रामजी नगर , वरळी *

* मनमाळा टंक BMC स्कूल, माटुंगा *

* अंकुर बुद्ध विहार , नायगाव *

* माटुंगा लेबर कॅम्प *

* दूधडेयरी वरळी *

* ललित कला भवन , नायगाव *

* ललित कला भवन , वरळी *

* वरळी BDD 106*

First published: December 5, 2017, 9:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading