शिवसेनेला खिंडार, तीन नेते भाजपच्या गळाला, आयुक्तांकडे सोपवला राजीनामा

शिवसेनेला खिंडार,  तीन नेते भाजपच्या गळाला, आयुक्तांकडे सोपवला राजीनामा

नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार पडलं आहे. 3 नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. घनसोलीतील तीन नगरसेवकांनी आयुक्तांकडे राजीनामा सोपवला आहे.

  • Share this:

नवी मुंबई,13 मार्च: नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार पडलं आहे. 3 नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. घनसोलीतील तीन नगरसेवकांनी आयुक्तांकडे राजीनामा सोपवला आहे. नगरसेवक प्रशांत पाटील, नगरसेविका कमलताई पाटील आणि नगरसेविका सुवर्णा पाटील यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेतचे तिन्ही नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बॅनरवर झळकला भाजप नेत्यांचे फोटो

घणसोलीतील प्रशांत पाटील यांच्यासह त्यांच्या परिवारातील तीन नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. घणसोली सेंट्रल पार्क व इतर विकासकामामच्या उद्घाटनासाठी प्रशांत पाटील यांनी लावलेल्या बॅनरवर भाजपचे आमदार गणेश नाईक आणि इतर भाजप नेत्यांचे फोटो झळकले होते.या सोहळ्याला थेट गणेश नाईक यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

हेही वाचा..मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये थिएटर्स आणि जिम बंद, पुण्यात शाळांना सुट्टी; मुख्यमंत्र्यांनी केल्या अनेक मोठ्या घोषणा

शिवसेनेत गटबाजी?

शिवसेनेत गटबाजी वाढली असून त्याला कंटाळून संबंधित नगरसेवकांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील भाजपच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या चारही नगरसेकांनी आपले राजीनामे महापालिका आयुक्त अण्णा मिसाळ यांच्याकडे सुपूर्द केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या चारही नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला होता. माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, त्यांची पत्नी नगरसेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी यांचा यात समावेश आहे. मात्र, आता शिवसेनेच्या 3 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. तिन्ही नेते

लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा..'तुमच्यातीलच एखादा ज्योतिरादित्य होईल...' अजित पवारांनी अशी बॅटिंग केली की विरोधकही हसून-हसून लोटपोट

First published: March 13, 2020, 6:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading