'कामाला लागा, आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतून लढणार', शिवसेनेच्या 'या' नेत्याची घोषणा

'कामाला लागा, आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतून लढणार', शिवसेनेच्या 'या' नेत्याची घोषणा

आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा पुर्नउच्चार शुक्रवारी (30 ऑगस्ट) वरळी विधानसभा मतदारसंघातील गटप्रमुखांच्या झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे राज्याचा कानाकोपरा पिंजून काढत आहेत. यादरम्यानच आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे. आदित्य ठाकरेंसाठी मुंबईतल्या सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरू असल्याचंदेखील काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा पुर्नउच्चार शुक्रवारी (30 ऑगस्ट) वरळी विधानसभा मतदारसंघातील गटप्रमुखांच्या झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.

'आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवावी आणि राज्याचे नेतृत्व करावं', अशी शिवसेनेच्या गटप्रमुखांनी मागणी केली. गटप्रमुखांच्या या मागणीवर आमदार अनिल परब यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. पुढे ते असंही म्हणाले की,विधानसभा निवडणुकीत वरळीतला जो उमेदवार आहे, तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मुख्यमंत्री म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत'.

(वाचा : उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला फक्त 'या' एका कारणामुळे लागू शकतो ब्रेक)

वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा 'ए' प्लस मतदारसंघ आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी इथूनच विधानसभा निवडणूक लढण्याचे निश्चित करावे, असं मत अनिल परब यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेशही त्यांनी वरळीतील शिवसैनिकांना दिला. यापूर्वी युवासेनेने आदित्य यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी देखील आपली इच्छा बोलून दाखवली.

(वाचा : मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या विनोद पाटलांना आदित्य ठाकरेंची स्पेशल ऑफर!)

आदित्य ठाकरे यांना अनेकदा निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारले जातातय. यावर शिवसैनिक आणि जनता सांगेल ते करणार, असं उत्तर देतात. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आदित्यच्या निवडणूक लढवण्याचा निर्णय सर्वस्वी त्याचा असेल असे अनकेदा स्पष्ट केलं आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या मागणीचे आमदार सुनिल शिंदे आणि सचिन अहिर यांनी स्वागत केलं. आदित्य ठाकरेंना एक लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकून आणणार, असा कार्यकर्त्यांना विश्वास यावेळी दिला. या मेळाव्याला खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते अनिल परब, आमदार सुनिल शिंदे आणि माजी आमदार सचिन अहिर उपस्थित होते.

(वाचा :मुंबई गॅंगरेप: राष्ट्रवादीचे आंदोलन वादाच्या भोवऱ्यात, बॅनरवर लिहिलं असं)

SPECIAL REPORT: भाजपच्या उलट्या फॉर्म्युल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?

Published by: Akshay Shitole
First published: August 31, 2019, 9:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading