यवतमाळ : नेर नगरपरिषदेवर फडकला शिवसेनेचा भगवा

यवतमाळ : नेर नगरपरिषदेवर फडकला शिवसेनेचा भगवा

यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर नगरपरिषदेचे निकाल आता समोर आले आहेत. नेर नगरपरिषदेवर शिवसेनेनं झेंडा फडकावला आहे.

  • Share this:

यवतमाळ, 10 डिसेंबर :  यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर नगरपरिषदेचे निकाल आता समोर आले आहेत. नेर नगरपरिषदेवर शिवसेनेनं झेंडा फडकावला आहे. नेर नगरपरिषदेसाठी एकूण 18 जागांवर निवडणुका झाल्या होत्या. त्यात शिवसेनेनं बाजी मारली आहे. शिवसेनेनं 9 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेस 4, राष्ट्रवादी 3 आणि अपक्ष 2 अशा जागांवर विजय मिळाला आहे.

नेर नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या सुनिता जयस्वाल यांचा विजय झाला आहे. तर तिकडे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नांदेडची लोहा नगरपरिषद भाजपच्या खात्यात आली आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी ही जागा जिंकली आहे. तर यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हानांना मोठा धक्का बसला असं म्हणायला हरकत नाही.

लोहा नगर परिषदेच्या 17 जागांपैकी 13 जागांवर भाजपने सत्ता स्थापन केली आहे तर फक्त 4 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे गजानन सूर्यवंशी विजयी झाले आहेत तर काँग्रेसचे सोनू संगेवार हे पराभूत झाले आहेत. या सगळ्या आकड्यांमुळे नांदेडमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. तर तिकडे धुळे आणि अहमदनगरमध्ये महापालिकांचे निकाल आता अंतिम टप्प्यात आले आहेत.

तर चंद्रपुरमध्ये मात्र काँग्रेस आपली सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वी झाली आहे. ब्रम्हपुरी नगरपरिषदेवर कांग्रेसने आपला झेंडा रोवला आहे. नगराध्यपदाच्या निवडणुकीत कांग्रेसच्या रीता उराडे 1600 मतांनी विजयी झाल्या आहेत.  ब्रम्हपुरी नगरपरिषद निवडणूक निकालात 20 पैकी 12 काँग्रेस,  भाजप  3 अपक्ष तर  5 इतर अशी लढत आहे. विधानसभेतले कांग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांना नगरपरिषदेवर वर्चस्व मिळवण्यात यश आलं आहे.

VIDEO : कांद्याला 1 रुपया भाव , संतापलेल्या शेतकऱ्याने फुकट वाटले कांदे

First published: December 10, 2018, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading