आमची युती अजूनही तुटली नाही, आमदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

आमची युती अजूनही तुटली नाही, आमदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

एकीकडे सत्ता स्थापनेसाठी शिवसेना निर्णयावर ठाम आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : आपण युती अद्यापही तोडलेली नाही. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आहे. वेळ अजुनही गेलेली नाही. 50-50च्या फॉर्म्युल्यावर ठरवावं असे स्पष्ट संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांची आमदारांसोबतची बैठक पार पडली आहे. त्यावर युतीची चर्चा अजूनही होऊ शकते. पण मुख्यमंत्री पदाच्या पालखीत शिवसेना बसणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

एकीकडे सत्ता स्थापनेसाठी शिवसेना निर्णयावर ठाम आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिलं आहे. हे निमंत्रण स्वीकारावे की नाही याबाबत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक 'वर्षा' बंगल्यावर झाली. भाजप अंतिम निर्णयापर्यंत पोहोचला असून अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पण भाजप नेत्यांची दुपारी 4 वाजता पुन्हा बैठक होणार असून त्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्तास्थापनेबाबत अधिकृत भूमिका मांडणार आहे. नंतर आमचा निर्णय राज्यपालांना कळवण्यात येईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. दरम्यान, सत्तासंघर्षामुळे राज्यपालांचा नियोजित नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे.  बहुमताच्या अग्निपरीक्षेला भाजप सामोरे जाणार का, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

सध्या राज्यात शिवसेना-भाजप मध्ये सत्तासंघर्ष अधिक वाढल्याचे पाहायला मिळतं. राज्यपाल यांनी भाजपाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिल्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. सध्या शिवसेनेच्या आमदारांना मालाडमध्ये द रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याठिकाणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, गजानन कीर्तिकर, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, अनिल देसाई  यांनी काल रात्री उशिरा हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली होती. तर आज उद्धव ठाकरे यांनीही आमदारांची भेट घेत महत्त्वाची बैठक घेतली.

सेना आमदार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक इथे पार पडणार आहे. एकीकडे काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या अनुषंगाने शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेत भाजपला धक्का देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, भाजपसोबत युतीत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना इच्छुक नसल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

इतर बातम्या - राज्यात 'सेना-महाआघाडी' करणार सत्ता स्थापन? सोनिया गांधी घेणार मोठा निर्णय

काँग्रेस आमचा दुश्मन नाही  

काँग्रेस राज्याचा दुश्मन नाही असं शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत असा दावाही त्यांनी केला. राज्यतली अस्थिरता संपावी अशीच शिवसेनेची भूमिका असल्याचंही ते म्हणालेत. भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देण्यात आल्याचं त्यांनी स्वागत केलं. भाजपनं 24 तासांत सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा होता असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीकडे चांगले नेते होते आणि आहेत असंही राऊत म्हणालेत. राऊतांच्या काँग्रेसबद्दलच्या विधानामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलं आहे.

इतर बातम्या - शोले पार्ट 2! एकतर्फी प्रेमवीराने चक्क प्रेयसीच्या घरासमोरील भिंत पाडली, कारण...

कोण असेल शिवसेनेचा मुख्यमंत्री?

राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री शिवसेनेचाचं असेल असं ठणकाऊन सांगणाऱ्या शिवसेनेमध्ये मात्र मुख्यमंत्री कोण व्हावा यावरून दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. मातोश्रीबाहेरच दोन वेगळी पोस्टर्स लागल्याचं दिसून येत आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंचा फोटो आहे तर तिथेच दुसऱ्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे की उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

शरद पवारांच्या उपस्थितीत 12 नोव्हेंबरला मुंबईत बैठक

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक 12 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही आमदार नवाब मलिक यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 03:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading