जे नको ते मतदारांनी नाकारलं; उद्धव ठाकरेंची प्रखर प्रतिक्रिया

जे नको ते मतदारांनी नाकारलं; उद्धव ठाकरेंची प्रखर प्रतिक्रिया

पर्याय कोण या फालतू प्रश्नात गुंतून न पडता 4 राज्यांच्या मतदारांनी जे धाडस दाखवलं, त्यांच्या या बेडरपणाचं मी अभिनंदन करतो अशा प्रखर शब्दात उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : जे नको ते मतदारांनी नाकारलं आहे. त्यासाठी सगळ्या मतदारांचे आभार अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पर्याय कोण या फालतू प्रश्नात गुंतून न पडता 4 राज्यांच्या मतदारांनी जे धाडस दाखवलं, त्यांच्या या बेडरपणाचं मी अभिनंदन करतो अशा कडक शब्दात उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

देशातील सगळ्यात महत्त्वाच्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता अंतिम टप्प्यात आले आहे. मतदानाच्या पेट्या जसजशा खुलल्या तसतशी काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. राज्यस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाली आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

तर पाच राज्यातले विधानसभाचे निकाल हा काँग्रेसचा विजय नसून लोकांचा राग आहे. भाजपने या निकालांचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. भाजपचं सरकार असलेल्या तीन मुख्य राज्यांमध्ये भाजपचा पराभव होतोय. तर तेलंगणात टीआरएसने घवघवीत यश मिळवलंय. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्येही भाजप पराभवाच्या छायेत आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपला दिलेला हा सल्ला महत्वाचा मानला जातोय.

मोदींनी बोलवली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल आणि उर्जित पटेल यांनी दिलेला राजीनामा या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत देशातल्या स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यावरही या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

संसद भवनात झालेल्या एका बैठकीनंतर पंतप्रधानांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. अधिवेशनात लोकांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी असं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र निकालावर कुठलंही भाष्य केलं नाही. विधानसभांच्या मतमोजणीत राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तिसगढमध्ये काँग्रेसची आघाडी आहे. तर तेलंगणात टीआरएसची लाट आलीय. त्या लाटेल इतर सर्वपक्ष भुईसपाट झाले. या निकालाचे पडसाद संसदेच्या अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे.

आठवले यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाला बेदम चोप, पहिला VIDEO

 

First published: December 11, 2018, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading