जास्तीची एक काडीही नको, भाजपच्या बैठकीनंतर शिवसेनेचं थेट उत्तर

प्रस्ताव एका ओळीचा आहे. जे निवडणूकीपूर्वी ठरलं आहे ते मान्य करा आणि त्यानुसार वागा अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 08:06 PM IST

जास्तीची एक काडीही नको, भाजपच्या बैठकीनंतर शिवसेनेचं थेट उत्तर

मुंबई, 05 नोव्हेंबर : राज्यात भाजप शिवसेना महायुतीचेच सरकार येणार आहे असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आल्यानंतर आता शिवसेनेकडूनही त्यावर प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. पण जे निवडणुकांआधी ठरलं आहे त्यानुसार करा असा एका ओळीचा प्रस्ताव असताना त्यावर अधिक चर्चा करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमेटीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. पण भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. आमच्या मनात कुठलीही शंका नाही. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. संसदीय मंडळानेही त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यावर आता शिवसेनेकडूनही ठाम भूमिका घेण्यात आली आहे.

प्रस्ताव एका ओळीचा आहे. जे निवडणूकीपूर्वी ठरलं आहे ते मान्य करा आणि त्यानुसार वागा अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितल्या प्रमाणे, आम्हाला एक पद किंवा एकही जागा जास्त नको. दिलेला शब्द पाळा आणि सरकार स्थापन करा असंही राऊत म्हणाले. त्यामुळे 50-50च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना अद्यापही ठाम आहे. तर मुख्यमंत्री हा भाजपचा होणार हे भाजपनेही ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे आता या वादाला पुढे काय वळण लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे

- निवडणुकीच्या आधी जे ठरलं होतं तेच करा. याच्यापलीकडे कोणताही प्रस्ताव नाही.

Loading...

- उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे जास्तीची एक काडीही नको. फक्त ठरल्याप्रमाणे करा.

- शब्द पाळावा आणि चर्चा करावी. आमची कोणतीही अडचण नाही

- विश्वासाचं नात टिकवण्यासाठी झालेली चर्चा महत्त्वाची आहे.

- एका ओळीचा प्रस्ताव आहे. त्यामुळे त्याच्यावर फार चर्चा करण्याची गरज नाही

- ठरल्याप्रमाणे करू आणि पुढे जाऊ, यासाठी शिवसेना तयार आहे

- पवारांसोबत आमची युती नाही. त्यामुळे शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव नसल्याचं पवार म्हणू शकतात.

- शिवसेनेकडून प्रस्ताव आला नाही असं बोलण्याचा भारतीय जनता पक्षाला अधिकार नाही कारण आमच्यात आधीच ठरलं होतं.

- काहीच ठरत नसल्यामुळे, काही लोकांच्या हट्टामुळे हे राज्य राष्ट्रपती राजवटीकडे पण शिवसेना हे होऊ देणार नाही

- ठरल्याप्रमाणे करा, या पलीकडे सेनेची कोणतीही मागणी नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 08:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...