Home /News /news /

शिवसेनेच्या आणखी आमदाराला कोरोनाची लागण, उपचारासाठी मुंबईत हलवलं

शिवसेनेच्या आणखी आमदाराला कोरोनाची लागण, उपचारासाठी मुंबईत हलवलं

नाशिक विधानपरिषदेचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

लक्ष्णण घाटोळ (प्रतिनिधी), नाशिक, 19 जुलै: नाशिक विधानपरिषदेचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आमदार नरेंद्र दराडे यांना मुंबईमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आमदार दराडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा...'हिंदू हृदयसम्राट यांचे चिरंजीव सत्तेत आसताना साधू, संत, कीर्तनकारांवर अन्याय' दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, त्यांची पत्नी सुनिता गडाख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी स्वत: हून क्वारंटाइन झाले आहेत. सुनिता गडाख यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक शहरात कोरोनाचा उद्रेक... नाशिक शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस आहे. त्यामुळे शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी दिवसभरात 311 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहे. तर कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येनं 5 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. शहरात 5722 पॉझिटिव्ह तर 3792 रुग्ण झाले बरे आहेत. आतापर्यंत 205 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात कोरोना संसर्ग आणि बळी यांचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट नाशिक शहर आहे. शहरात एकूण प्रतिबंधित क्षेत्र संख्या 322 आहे. राष्ट्रवादीला दु:खद धक्का, कोरोनामुळे ज्येष्ठ नेत्याचे निधन दुसरीकडे, पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. पुण्यात अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे (वय 58) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हेही वाचा...कोरोनाची दहशत वाढली! रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्यानं पाचव्या मजल्यावरून मारली उडी जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांचा कोरोनामुळे पहाटे पुणे येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले आहे. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या