मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सुशांत प्रकरणात छाती बडवून घेणारे आता कुठे गेले? सेनेच्या मंत्र्यांचा थेट सवाल

सुशांत प्रकरणात छाती बडवून घेणारे आता कुठे गेले? सेनेच्या मंत्र्यांचा थेट सवाल

सुशांत सिंग हा ड्रग्स घेत होता. हे सगळे सांगत आहेत. त्याच्यासाठी दिल्लीची टीम मुंबईत आली. पण काय साध्य झालं?

सुशांत सिंग हा ड्रग्स घेत होता. हे सगळे सांगत आहेत. त्याच्यासाठी दिल्लीची टीम मुंबईत आली. पण काय साध्य झालं?

सुशांत सिंग हा ड्रग्स घेत होता. हे सगळे सांगत आहेत. त्याच्यासाठी दिल्लीची टीम मुंबईत आली. पण काय साध्य झालं?

    मुंबई, 28 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. या प्रकरणाच्या तपासावरून दोन्ही पक्षात चांगलेच शितयुद्ध पेटले होते. सीबीआयने तपास केल्यानंतर या प्रकरणाचा तपास आता NCB करत आहे. पण,  या प्रकरणात जे छाती बडवून घेत होते ते आता कुठे गेले ? असा संतप्त सवाल शिवसेनेचे मंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपस्थितीत केला. न्यूज18 लोकमतशी बोलत असताना अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'सुशांत सिंग राजपूत प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी केली गेली. आता त्याची भरपाई कोण देणार?  सुशांत सिंग हा ड्रग्स घेत होता. हे सगळे सांगत आहेत. त्याच्यासाठी दिल्लीची टीम मुंबईत आली. पण काय साध्य झालं? आता या प्रकरणात आतापर्यंत जे नेते छाती बडवून घेत होते ते आता कुठे गेले?' असा सवाल परब यांनी थेट विचारला. तसंच, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदारांना भेटणार नाही तर कोणाला भेटणार, विभागवार आमदारांच्या बैठका होणार आहेत. स्थानिक प्रश्न मार्गी लागतील. गेले अनेक दिवस व्हर्चुअल मीटिंग्स होत होत्या. आता आमने सामने बैठका घेतल्या जाणार आहे, अशी माहितीही परब यांनी दिली. 'मराठा आरक्षणावरून कोणी राजकारण करू नये, सर्वांच्या संमतीनं हे विधेयक विधिमंडळात पास झालं होतं मग आता राजकारण करायची काय गरज आहे, असा सवालही परब यांनी उपस्थितीत केला. NCB ची 20 सेलिब्रिटींवर नजर, लवकरच चार्जशीट दाखल दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) लवकरच चार्जशीट दाखल करणार आहे. मोठमोठे बॉलिवूड सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यापैकी काही जणांची आता चौकशी सुरू आहे. शिवाय आणखी अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आधीच अटक झाली आहे. आता दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांची चौकशी सुरू आहे. तसंच 48 तासांत आणखी काही बड्या स्टार्सनादेखील एनसीबीची चौकशीसाठी समन्स बजावणार असल्याची माहिती मिळते आहे.  आतापर्यंत कमीत कमी 18 जणांना अटक करण्यात आली आहे. शिवाय अजूनही  20 पेक्षा अधिक ड्रग्ज पेडलर्सवर एनसीबीची नजर आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: शिवसेना

    पुढील बातम्या