शिवसेनाप्रमुखांच्या मुशित तयार झालेला नेता हरपला, शशिकांत पाटकर यांचं निधन

शिवसेनाप्रमुखांच्या मुशित तयार झालेला नेता हरपला, शशिकांत पाटकर यांचं निधन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशित तयार झालेला शिवसैनिक अशी शशिकांत पाटकर यांची ओळख होती.

  • Share this:

मुंबई, 22 मे: विले पार्लेमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक शशिकांत पाटकर (वय-50) यांचं शु्क्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशित तयार झालेला शिवसैनिक अशी शशिकांत पाटकर यांची ओळख होती.

विले पार्ल्यातील संस्कृती पुढे नेणारा शशिकांत पार्लेकर कायमचे निघून गेल्याने पार्लेकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा.. ...तर काळ्या चड्डया घालून तेव्हा आंदोलन करायचं होतं, संजय राऊत यांची भाजपवर टीका

अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणसाठी शरयू नदीच्या तिरावर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब महाआरती केली होती. यावेळी मुंबईसह उपनगरातही शिवसेनेकडूनही महाआरती आणि घंटानादचं आयोजन करण्यात आलं होतं. विलेपार्ले पूर्व कोलडोंगरी, शिवाजी चौक येथे शिवसेनेतर्फे महायज्ञ करण्यात आला होता. यावेळी 'शशिकांत पाटकर यांनी हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार' असा मथळा लिहिलेल्या सुमारे 50 हजार आरती पुस्तकांचे वितरणा केले होते. मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या महाआरतीत हिंदुत्ववादी संघटना, धार्मिक संघटना, वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक मंडळ व इतर संघटना सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा.. आदित्य ठाकरे भाजपच्या राजकारणाला म्हणाले Shameful

दरम्यान, शशिकांत पाटकर यांनी 2014 मध्ये विले पार्ले विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना परभवाचा सामना करावा लागला होता. भाजपचे उमदेवार पराग अलावाणी यांनी शशिकांत पाटकर यांचा पराभव केला होता.

 

First published: May 22, 2020, 3:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading