मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /BREAKING : शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे Covid-19 पॉझिटिव्ह

BREAKING : शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे Covid-19 पॉझिटिव्ह

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

मुंबई, 20 मार्च : राज्यात कोरोनाचं कहर वाढत आहे. त्यातच एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली. (Shiv Sena leader and environment minister Aditya Thackeray Covid-19 positive) त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नागरिकांना सजग राहण्याचं आवाहन केलं आहे.

शिवसेनेतील अनेक मंत्री आणि नेत्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.

हे ही वाचा-मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कोरोनाची चाचणी करण्यास नकार दिल्यावर गुन्हा दाखल होणार!

यापूर्वी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, चंद्रकांत खैरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुपूत्र आणि पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.

First published:
top videos

    Tags: Aaditya thackeray, Corona updates, Maharashtra, Shivsena