'भाजापासोबत मैत्री धर्म पाळला म्हणून विदर्भात शिवसेना वाढू शकली नाही'

'भाजापासोबत मैत्री धर्म पाळला म्हणून विदर्भात शिवसेना वाढू शकली नाही'

आता काडीमोड झाल्यानंतर दुसरा संसार मार्गी लागण्याच्या तयारीत असतानाही शिवसेनेकडून भाजपवर टीकासस्त्र संपत नाही आहे.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी

मुंबई, 27 नोव्हेंबर : राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. निवडणुका आणि निकाल लागल्यानंतर रोज एक नवीन राजकीय नाट्य जनतेनं पाहिलं. त्यात एकीकडे सगळ्यात जास्त जागा मिळूनही भाजप एकटं पडलं आणि दुसरीकडे वेगवेगळे विचार असलेले तीन पक्ष म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आता 'महाविकासआघाडी' या नावाखाली एकत्र संसार थाटण्याच्या तयारीत आहेत.

खरंतर, शिवसेना भाजपसोबत युतीमध्ये होती तेव्हा सगळं ठीक होतं. पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये हमरी-तुमरी सुरू झालं आणि गोष्ट अगदी काडीमोड होईपर्यंत गेली. आता काडीमोड झाल्यानंतर दुसरा संसार मार्गी लागण्याच्या तयारीत असतानाही शिवसेनेकडून भाजपवर टीकासस्त्र संपत नाही आहे. आजवर भाजापासोबत मैत्री धर्म पाळला म्हणून विदर्भात शिवसेना वाढू शकली नाही असं विधान शिवसेनेचे आमदार गोपिकीशन बाजोरीया यांनी केलं आहे.

आता महाविकासआघाडीचं सरकार येणार आहे. त्यामुळे यापुढे विदर्भात शिवसेना पक्ष वाढण्यास मदत होईल असं वक्तव्य गोपिकीशन यांनी केलं. गोपिकीशन हे जुने शिवसैनिक असून अकोला जिल्ह्यातून विधानपरिषदेवर सदस्य आहेत. उद्धव ठाकरे यापुढे विदर्भात जातीने लक्ष देतील आणि विदर्भाचा सिंचनासह आमदारांचा अनुशेष भरून काढतील असा विश्वास बोजरीया यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील प्रत्येक 2 मंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेणार आहे. तिन्ही पक्षातील खाते वाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये खातेवाटपावर निर्णय झाला आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्री आणि 10 मंत्रिपदं असणार आहे. नगरविकास, सामान्य प्रशासन आणि उत्पादन शुल्क आणि जीएसटी ही खाती असणार आहे.

त्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद आणि 8 महत्त्वाची खाती असणार आहे. यामध्ये गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम सारखी मुख्य खाती ही राष्ट्रवादीकडे असणार आहे. तर काँग्रेसकडे 8 महत्त्वाची खाती असणार आहे. यामध्ये कृषी, महसूल, गृहनिर्माण आणि जलसंपदा ही महत्त्वाची खाते असणार आहे.

First Published: Nov 27, 2019 07:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading