डोंबिवलीत तुमच्या पगाराएवढा हफ्ता देतो फेरीवाला, सेना नगरसेवकाने जाहीर केलं रेटकार्ड

डोंबिवलीत तुमच्या पगाराएवढा हफ्ता देतो फेरीवाला, सेना नगरसेवकाने जाहीर केलं रेटकार्ड

आता उपोषण करण्याची नामुश्की शिवसेनेवर आलीये. शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे हे साखळी उपोषणाला बसलेत. यावेळी आम्ही सत्ताधारी असलो, तरी प्रशासन कारवाई करत नाही, असा आरोप त्यांनी केलाय.

  • Share this:

प्रदीप भणगे, डोंबिवली

12 जून : डोंबिवलीतील फेरिवाल्यांविरोधात सत्ताधारी शिवसेनेनं आंदोलनं करूनही फेरीवाले जैसे थेच आहेत. त्यामुळे आता चक्क उपोषण करण्याची वेळ शिवसेनेवर आलीये. एवढंच नाहीतर त्यांनी फेरीवाल्यांचं रेटकार्डही जाहीर केलंय.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही त्यांच्यावर मागील काही दिवसांत फेरिवाल्यांविरोधात आंदोलनं करण्याची वेळ आलीये. काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनात तर खुद्द महापौर राजेंद्र देवळेकर हेसुद्धा सहभागी झाले होते. मात्र तरीही फेरीवाले काही हटलेले नाहीत. त्यामुळे आता उपोषण करण्याची नामुश्की शिवसेनेवर आलीये.

शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे हे साखळी उपोषणाला बसलेत. यावेळी आम्ही सत्ताधारी असलो, तरी प्रशासन कारवाई करत नाही, असा आरोप त्यांनी केला. तसंच याठिकाणी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी किती हप्ते घेतात, याचं भलंमोठं रेटकार्डही लावण्यात आलंय. त्यामुळे आता सत्ताधा-यांच्या उपोषणाची दखल घेऊन तरी फेरिवाल्यांवर कारवाई होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.

असं आहे फेरीवाल्यांकडून मिळणाऱ्या हप्त्याचं  रेटकार्ड

1) महापालिका मुख्यालयासमोर - 30 हजार रुपये प्रति महिना

2) मधूबन टॉकीज फुटपाथ - 15 हजार रुपये आठवड्याला

3) रामनगरपर्यंत रातरोड - 17 हजार रुपये आठवड्याला

4) रामनगर आरटीओसमोर - 20 हजार रुपये प्रति महिना

5) केळकर रोड आणि शिवमंदिर - 10 हजार रुपये आठवड्याला

6) फुलवाले - 1 हजार 500 रुपये,

7) कपडेवाले - 2 हजार रुपये,

8) दाबेलीवाला - 3 हजार रुपये,

९) फरसाण - 3 हजार रुपये,

10) चायनीज - 3 हजार रुपये,

11) पाणीपुरीवाला - 2 हजार रुपये,

12) सरबतवाला - 4 हजार,

13) चहा आणि ताकवाला - 4 हजार रुपये,

14) चप्पलवाला - 5 हजार रुपये ( महिन्याला)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 07:55 PM IST

ताज्या बातम्या