नरेंद्र मोदींवरच्या अ'विश्वासा'वरून शिवसेनेत गोंधळ

अविश्वास प्रस्तावाच्या मुद्यावरून शिवसेनेतला गोंधळ पुन्हा एकदा समोर आला. शिवसेनेचे प्रतोद आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी व्हिप काढून सर्व खासदारांना सरकारच्या बाजूनं मतदान करण्याचा व्हिप काढला आणि नंतर असा व्हिप काढला नसल्याचा दावा केला.

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2018 08:07 PM IST

नरेंद्र मोदींवरच्या अ'विश्वासा'वरून शिवसेनेत गोंधळ

मुंबई,ता. 20 जुलै : टीडीपाने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरून नरेंद्र मोदी सरकारला काही धोका नव्हता. मात्र शिवसेना कुठली भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. भाजप आणि शिवसेनेचे संबंध बघता शिवसेना काय करणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र याही मुद्यावरून शिवसेनेतला गोंधळ पुन्हा एकदा समोर आला. शिवसेनेचे प्रतोद आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी व्हिप काढून सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचा आणि सरकारच्या बाजूनं मतदान करण्याचा व्हिप काढला. तो माध्यमांमध्ये प्रसिद्धही झाला. मात्र नंतर तो व्हिप आम्ही काढलाच नाही, उद्धव ठाकरे वेळेवर निर्णय घेणार आहेत, तो आम्ही खासदारांना सांगितलं असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं. तर अस व्हिप मी काढलाच नसून कुणीतरी खोडसाळपणे ते कृत्य केल्याचं चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधानपदाची आब राखा, सुमित्रा महाजन यांची राहुल गांधींना समज

राहुल गांधींनी नेमका कुणाला मारला डोळा?

तर अविश्वास ठरावाच्या दिवशी शुक्रवारी शिवसेना खासदार चर्चेत भागच घेणार नाहीत असं शिवसेनेनं सांगत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. सरकारमध्ये राहून सत्तेचा लाभ घ्यायचा आणि सरकारवर टीकाही करायची अशी शिवसेनेची भूमिका आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेकडून सातत्याने प्रहार केले जाताहेत. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो असं शिवसेनेचे मंत्री म्हणतात. देवेंद्र फडणवीस सरकारचा मृत्यू अटळ आहे फक्त त्याची तारिख आणि वेळ ठरायची आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी न्यूज18 लोकमतच्या एका कार्यक्रमातच केलं होतं. एवढा टोकाचा विरोध करूनही शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय.

नरेंद्र मोदींवरच्या आरोपात तथ्य, शिवसेनेच्या अडसुळांनी दिला राहुल गांधींना पाठिंबा

Loading...

VIDEO : राहुल गांधींच्या 'जादू की झप्पी'ने मोदींना धक्का!

मध्यंतरी अमित शहा यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंत दोनही पक्षांचे संबंध सुरळीत होतील असा कयास व्यक्त होत होता मात्र शिवसेनेनं टीकेची धार कमी कमी केलेली नाही. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजप दादागिरी करते शिवसेनेचं खच्चिकरण करण्याचा प्रयत्न करते असा शिवसेनेचा आरोप आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभेच्या निवडणूका भाजप-शिवसेना एकत्र लढणार की स्वबळावर हे पाहाणं औत्स्युक्याचं ठरणार आहे. शिवसेनेच्या भूमिकेत गोंधळ नसून तो आमच्या डावपेचांचा भाग आहे असा शिवसेना सासत्यानं दावा करत असते. मात्र या भूमिकेमुळं पक्षातला गोंधळ बाहेर आला हे निश्चित.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2018 08:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...