यूपीत योगी तर महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार, उद्धव ठाकरेंची पुन्हा भाजपवर टीका

पक्ष मजबूत करण्याचं स्वप्न बघताय, देश मजबूत करण्यचं स्वप्न कधी बघणार?, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 4, 2017 12:21 PM IST

यूपीत योगी तर महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार, उद्धव ठाकरेंची पुन्हा भाजपवर टीका

04 मे : उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे, तर महाराष्ट्रामध्ये निरुपयोगी सरकार आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. शिवाय, पक्ष मजबूत करण्याचं स्वप्न बघताय, देश मजबूत करण्यचं स्वप्न कधी बघणार?, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

शिवसेना आमदार, नगरसेवक आणि पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या सलग तीन दिवस मुंबईत बैठका सुरू आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

मध्यावधी निवडणुकांबाबतही उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात वक्तव्य केले. ते म्हणाले, मध्यावधी निवडणुका उद्या कशाला? आजच घ्या, आम्ही त्यासाठी तयार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

एका सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान सुधारणार नाही. पाकिस्तानमध्ये घुसा आणि पाकिस्तानचे तुकडे पाडा. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे.” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला केलं.

त्यासोबतच, फक्त गाय वाचवण्याची गरज नाही, देश वाचवण्याची गरज आहे. देश वाचला तर गाय वाचेल, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 4, 2017 12:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...