शिवसेनेला भाजपची साथ या कारणास्तव सोडता येणार नाही!

Shiv Sena -BJP Alliance : शिवसेनेची इच्छा असून देखील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांना भाजपसोबतची युती तोडता येणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 01:09 PM IST

शिवसेनेला भाजपची साथ या कारणास्तव सोडता येणार नाही!

मुंबई, 07 जुलै : शिवसेना भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष ! लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. परस्परांवर चिखलफेक केल्यानंतर देखील दोन्ही पक्षांनी राजकीय परिस्थिती ओळखत लोकसभा आणि विधानसभेसाठी युती केली. त्यानंतर शिवसेनेवर कायम टीका होत राहिली. शिवसेनेचा स्वाभिमान कुठे आहे? असा सवाल विचारले जात आहेत. पण, सध्याची राजकीय स्थिती पूर्णता वेगळी आहे. त्यामुळे युती तोडणं दोन्ही पक्षांना परवडणारे नाही. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी देखील आता दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमधील कुरबुर समोर आली असली तरी त्याचा बोभाटा होणार नाही याची काळजी मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे. शिवाय, राजकीय स्थिती ओळखून सर्वकाही सुरू आहे. युती कायम कायम ठेवण्यामागे देखील काही कारणं आहेत.

Air Strikeनंतर दहशतवाद्यांना पळता भूई थोडी; या ठिकाणी हलवले तळ

लोकसभा निवडणुकीनंतर बदलली राजकीय स्थिती

लोकसभा निवडणुकीत भाजपला 2014प्रमाणे यश मिळणार नाही अशी चर्चा होती. पण, निकालाअंती मात्र देशातील भाजपची ताकद स्पष्ट झाली. शिवाय, राज्यात देखील भाजपनं जास्त जागा जिंकल्या. भाजपनं राष्ट्रीय अस्मितेचा प्रचारामध्ये केलेला वापर दोन्ही पक्षांना राज्यात देखील फायदेशीर ठरला.

राफेल विमानांना कबुतरांपासून धोका; IAFनं व्यक्त केली चिंता

Loading...

विधानसभेत सर्वाधिक जागा

2009मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं 46 तर भाजपनं 44 जागा जिंकल्या होत्या. पण, 2014मध्ये मात्र परिस्थिती पूर्ण उलटी होती. कारण, विरोधात लढून देखील भाजपला 122 जागा जिंकता आल्या. तर शिवसेनेनं 63 जागांवर बाजी मारली. भाजपला 23 तर, शिवसेनेला 19 टक्के मतं मिळाली. अखेर दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. लोकसभेनंतर लगेगच विधानसभा निवडणुका होणार असल्यानं भाजपचा त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे युती तोडणं शिवसेनेच्या फायद्याचं नाही.

तुकोबांच्या पालखींचं तिसरं गोल रिंगण, पाहा EXCLUSIVE व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 01:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...