शिवसेनेत येण्यासाठी शिवसैनिकांचं छगन भुजबळांना साकडं!

शिवसेनेत येण्यासाठी शिवसैनिकांचं छगन भुजबळांना साकडं!

छगन भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश हा नक्की समजला जातोय. मात्र तो केव्हा होणार याबाबत वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत. भुजबळ हे पंकज आणि समीर यांच्यासह शिवसेनेत येतील असा अंदाज आहे.

  • Share this:

बब्बू शेख, येवला 3 सप्टेंबर : छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर नाशिकच्या काही सेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध  केला. मात्र दुसरीकडे छगन भुजबळ त्यांच्या येवला मतदारसंघातील शिवसैनिकांनी त्यांना पक्षात येण्यासाठी साकडं घातलं. भुजबळ हे विंचूर भागात  विकास कामांच्या उद्घाटनांसाठी आले असता येवला मतदारसंघातील असंख्य शिवसैनिकांनी कार्यक्रमाच्या स्थळी येऊन त्यांची भेट घेतली व त्यांनी सेनेत लवकरात लवकर प्रवेश करावा यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. भुजबळांना भगवी शाल देऊन साकडेही घातले. छगन भुजबळांनी मात्र कार्यकर्त्या सोबत फक्त हस्तांदोलन केलं. प्रवेशा बाबत मात्र त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही.  शिवसैनिकांची ही कृती बोलकी असून भुजबळांच्या मौनात मोठा अर्थ दडलेला असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

परभणीत पाऊस आला आणि शेतकऱ्यांच्या जीवात जीव!

छगन भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश हा नक्की समजला जातोय. मात्र तो केव्हा होणार याबाबत वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत. भुजबळ हे पंकज आणि समीर यांच्यासह शिवसेनेत येतील असा अंदाज आहे. याबाबतही बोलणी पूर्ण झाली असल्याचीही चर्चा आहे.

सुप्रिया सुळेंच्या यात्रेला मारली दांडी

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या राज्याच्या 'संवाद' यात्रेवर होत्या. मरगळ आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणणं आणि पक्षाला लागलेली गळती रोखणं हा त्यांच्या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे. या यात्रेत त्या त्या जिल्ह्यातले पक्षाचे ज्येष्ठ नेते हजेरी लावत आहेत. मात्र ही यात्रा जेव्हा नाशिकमध्ये आली तेव्हा सुप्रियाताईंच्या सोबत पक्षाचे दिग्गज नेते छगन भुजबळ दिसले नाहीत. नाशिक हा भुजबळांचा बालेकिल्ला समजला जातो. गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीची नाशिकमधली एकहाती सत्ता ही भुजबळांच्या हातात होती. मात्र ते सध्या पक्षावर नाराज असल्याने त्यांनी संवाद यात्रेकडे पाठ फिरवत शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले होते.

मुंबई मेट्रो रेल्वेत मोठी व्हेकन्सी, 'या' उमेदवारांनी करा अर्ज

राजकारणात काहीही अशक्य नाही असं म्हटलं जातं. विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातही याचाच प्रत्यय येत आहे. एकेकाळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आणि नंतर राष्ट्रवादी गेलेल्या छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाने हेच पुन्हा एकदा दिसून आलं आहे. पक्षांतर्गत हेवेदाव्यांमुळे छगन भुजबळ यांनी जवळपास 28 वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. शिवसेना सोडून छगन भुजबळ हे आधी काँग्रेसमध्ये आणि नंतर शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत दाखल झाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 3, 2019, 6:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading