औरंगाबादेत शिवसेनाविरुद्ध भाजप.. वाळूजमध्ये मोबाइल शॉपीवर दगडफेक

शिवसेनेच्या कार्यकर्त्याने भाजप पदाधिकाऱ्याच्या मोबाइल शॉपीवर सोमवारी दुपारी दगडफेक केली.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 02:48 PM IST

औरंगाबादेत शिवसेनाविरुद्ध भाजप.. वाळूजमध्ये मोबाइल शॉपीवर दगडफेक

औरंगाबाद,21 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीत सोमवारी राज्यभर मतदान होत आहे. शिवसेना-भाजपमध्ये युती आहे. मात्र, औरंगाबादेत शिवसेनाविरूद्ध भाजप असे चित्र आहे. वाळूज परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्याने भाजप पदाधिकाऱ्याच्या मोबाइल शॉपीवर सोमवारी दुपारी दगडफेक केली. एवढेच नाही तर दुकानातील संगणकाची तोडफोड केली. दुकानात केलेली तोडफोड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रवी ऊर्फ दीपक काळे असे दगडफेक करणाऱ्या तरूणाचे नाव आहे.

दीपकने भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या श्री मोबाइल्स (जय भवानी चौक, बजाजनगर) येथील या दुकानावर सोमवारी दगडफेक करत दुकानातील संगणकाची तोडफोड केली. त्याने दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्ह करून धमकी दिली होती. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल रोडे व पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदरील पदाधिकारी भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचे काम करत असल्याचा रोष मनात धरून हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, आरोपी दीपकने दोन दिवसांपूर्वी 'फेसबुक'वर लाइव्ह करून पदाधिकाऱ्याला धमकी दिली होती. दगडफेक केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

युवकाचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही...

दगडफेक करणाऱ्या तरुणाशी शिवसेनेचा काही संबंध नाही. स्वतःच्या वैयक्तिक कारणामुळे हा हल्ला केला असावा असे आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले आहे. संबधित कार्यकर्ता शिवसेनेचे उपरणे डोक्याला बांधून आला होता. यावरून हा पूर्वनियोजित कट असून त्याचे मुख्य सूत्रधार कोण याची माहिती घ्यावी, अशी मागणी संतोष चोरडिया यांनी पोलिसांकडे केली आहे.

Loading...

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 02:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...