शिवसेना सोबत नाही आली तर हा असू शकतो भाजपचा प्लान 'बी'

शिवसेना सोबत नाही आली तर हा असू शकतो भाजपचा प्लान 'बी'

एकीकडे भाजप युतीच्या सत्तेसाठी तयार आहे पण त्यात ते मुख्यमंत्री पदावर ठाम आहेत. दुसरीकडे सेनाही सत्तेसाठी तयार आहे आणि मुख्यमंत्री पदावर ते देखील ठाम आहेत.

  • Share this:

मुंबई, 05 नोव्हेंबर : विधानसभेनंतर आता सत्ता संघर्षात वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात आज भाजपच्या कोअर कमेटीची बैठक झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया दिली. राज्यात भाजप शिवसेना महायुतीचच सरकार येणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. आमच्या मनात कुठलीही शंका नाही असंही पाटील म्हणाले. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. संसदीय मंडळानेही त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं असंही त्यांनी स्पष्ट केलं. या सगळ्यावर आता शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, सेनेकडून अद्याप प्रस्ताव नसल्याचं भाजपने म्हटलं असलं तरी जे लोकसभेआधी ठरलं तोच प्रस्ताव होता. त्यासाठी वेगळी लिखापडी करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिणीला दिली. एकीकडे भाजप युतीच्या सत्तेसाठी तयार आहे पण त्यात ते मुख्यमंत्री पदावर ठाम आहेत. दुसरीकडे सेनाही सत्तेसाठी तयार आहे आणि मुख्यमंत्री पदावर ते देखील ठाम आहेत. त्यामुळे आता सेनेकडून प्रस्ताव किंवा पुढाकार आला नाही तर मोठा पक्ष म्हणून भाजपचा काय प्लान बी काय असू शकतो याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

'असा असू शकतो भाजपचा प्लान बी'

सत्तावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत सध्या रस्सीखेच सुरू आहे. पडद्यामागे असणाऱ्या या स्पर्धेवर आता उघडपणे चर्चा सुरू आहे. सत्ता स्थापनेविषयी बोलताना शिवसेनेचे 45 आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केला होता. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मंगळवारी एक खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेच्या तब्बल 45 आमदारांना भाजपसोबत येऊन सरकार स्थापन करण्यास उत्सुक आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताा काकडे यांनी हा दावा केला होता. यासंदर्भातील वृत्त ANI या वृत्तसंस्थेने देखील दिलं होतं. काकडे म्हणाले होते की, शिवसेनेच्या 56 पैकी 45 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. हे सर्व आमदार आम्हाला (भाजपला) फोन करत आहेत आणि सरकारमध्ये सहभागी होण्याबद्दल इच्छा व्यक्त करत आहेत असं काकडे म्हणाले होते.

इतर बातम्या - VIDEO : भाजपने दिला थेट सेनेला निरोप, चंद्रकांत पाटलांची UNCUT पत्रकार परिषद

या सर्व आमदारांचे असे म्हणणे आहे की, काहीही झाले तरी शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी झाले पाहिजे. शिवसेनेच्या 45 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करावी असे म्हटल्याचे काकडे यांनी सांगितलं होतं. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 288 पैकी भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांमध्ये सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु होण्याआधीच वाद सुरु झाला. निकालात 2014च्या तुलनेत भाजपच्या आमदारांची संख्या कमी झाल्याने शिवसेनेने सत्तेत बरोबरीचा वाटा मागितला आहे.

फक्त संजय काकडे यांच्याक़डूनच नाही तर अपक्ष आमदार रवी राणा यांनीही सेनेचे 20 ते 25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं दावा केला होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अपक्ष आमदार रवी राणा यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं म्हटलं होतं. राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने काम केलं आहे. तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं. तसेच सत्ता स्थापन झाल्यानंतर सेनेचे 20 ते 25 आमदार भाजपमध्ये जातील असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असेल तरी अद्याप कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 06:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading