Home /News /news /

देशभरात शिवजयंतीचा उत्साह; मुंबई, पुण्यासह दिल्लीतही कार्यक्रमांचं आयोजन

देशभरात शिवजयंतीचा उत्साह; मुंबई, पुण्यासह दिल्लीतही कार्यक्रमांचं आयोजन

उद्धव ठाकरे हे तिथीनुसार जयंतीला शिवनेरीवर येत असतात. मात्र, आता मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच तारखेनुसार जयंतीला येणार आहेत.

    मुंबई, 19 फेब्रुवारी : आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती आहे. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासकीय शिवजयंती निमित्त उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे हे तिथीनुसार जयंतीला शिवनेरीवर येत असतात. मात्र, आता मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच तारखेनुसार जयंतीला येणार आहेत. मुंबई, पुण्यासह दिल्लीमध्येही शिवजयंतीचा कार्यक्रम मोठा उत्साहात साजरा होणार आहे. नवी दिल्लीतील शिवजयंतीचं राजदूतांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. शिवभक्तांनी दिल्लीमधल्या शिवजयंती उत्सवला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून करण्यात आलं आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात आलेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये विक्रमी सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. या उपक्रमात 400 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यामध्ये चाळीस मिनिटांमध्ये 1 लाख 4 हजार 444 सूर्यनमस्कार घालण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात मध्यरात्री 12 वाजता पाळणा झुलवत शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. सोलापूरच्या इतिहासात प्रथमच डोळ्याचे पारणे फेडणारा हा जन्मोत्सव सोहळा ठरला. हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शिवजयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली. अतिशय आकर्षक असलेल्या या रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मुंबई- पुणे असा दररोजचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांकडून सिंहगड एक्सप्रेसमध्ये अनोख्यापद्धतीने शिवजंयती साजरी केली. अकोल्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे गेल्या आठवडाभरापासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यासोबतच स्पार्क फाऊंडेशनच्यावतीनं तीन दिवसीय शिवकालीन शस्त्र प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं. शिवजयंती मिरवणुकीची जय्यत तयारी नाशिकमध्ये सुरू आहे. या मिरवणुकीत 1 हजार ढोल ताशा वादक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे महिलाशक्तीचा अनोखा जागर खास आकर्षण ठरतय. वाद्यावर ताल धरलेल्या या वादकांची तालीम जोरात पार पडली. इतर बातम्या - अमर सिंह यांची मृत्यूशी झुंज, अंथरुणाला खिळलेले असताना मागितली अमिताभ यांची माफी शिर्डीतील कोल्हार भगवती येथील शिवजयंती उत्सव समितीने " शिवदिपोत्सव सोहळा " आयोजीत केला आहे. मशालीचा लखलखाट, असंख्य पेटलेले दिवे यांसह केलेली फटाक्यांची आतषबाजी लक्षवेधी ठरली. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून अंबरनाथमधील विद्यार्थांनी किल्ले बनवले आहेत. सुहासिनी अधिकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः हे किल्ले बनवले आहेत. सिंधुदुर्ग, शिवनेरी, राजगड, तोरणा, प्रतापगड यांसारखे 27 किल्ले या विद्यार्थ्यांनी बनवलेत. विशेष म्हणजे हे किल्ले कागदाच्या लगद्यापासून बनवण्यात आलेत. वाशिम जिल्ह्यातील शिवप्रेमी शिवजयंती निमित्त महाराष्ट्राचे वैभव असलेल्या किल्ल्यांविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये माहिती व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सन्मती कॉन्व्हेंटमध्ये किल्ले बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. इतर बातम्या - शिवेंद्रराजे भोसलेंची प्रकृती खालावली, रक्तदाबाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील महाराजांच्या पुतळ्याजवळ शेकडो महिलांनी मध्यरात्री एकत्रित येत दिवे लावून महाराजांच्या जन्माचे अनोखे स्वागत केले. गुलामगिरीचा अंधकार नाहीसा करून स्वातंत्र्याच्या हिंदवी स्वराज्यच्या क्रांतीचा दिपक लावणाऱ्या छत्रपतीशिवाजी महाराजांकडून अंधाराकडून प्रकाशाकडे आणि अन्यायाकडून न्याययाकडे घेऊन जाण्याची प्रेरणा मिळत राहावी याचा उद्देश आहे. पंढरपूर तालुक्यातील एका लहानग्याने शिवाजी महाराज यांच्या एक हजार चित्रांचा संग्रह केला आहे. पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या वेदांत विठ्ठल पाटील याला लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोंचा संग्रह करण्याचा छंद जडला. आणि त्यातूनच त्याच्या संग्रहात भर पडली आहे. इतर बातम्या - शिवजयंती : छत्रपती शिवरायांचे अनमोल विचार; आचरणात आणाल, तर बदलेल तुमचं जीवन
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Chatrapati shivaji maharaj

    पुढील बातम्या