शिर्डीत खळबळ, रस्त्याच्या कडेला आढळला तरुणाचा मृतदेह

शिर्डीत खळबळ, रस्त्याच्या कडेला आढळला तरुणाचा मृतदेह

रविंद्र मोरे असं मृत तरुणाचं नाव आहे. तो बेलापूर गावात राहणारा युवक आहे.

  • Share this:

शिर्डी, 17 जून : शिर्डी नगरीमध्ये रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने संपर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावा जवळील ऐनतपूर इथे रस्त्याच्या कडेला एका 25 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला आहे. भर दिवसा रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीने तरुणाचा मृतदेह आढल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रविंद्र मोरे असं मृत तरुणाचं नाव आहे. तो बेलापूर गावात राहणारा युवक आहे. स्थानिकांनी मृतदेह पाहताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून रविंद्रचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, रविंद्रच्या अंगावर कुठेही जखमा नाहीत. मात्र, त्याच्या तोंडातून रक्त आलं होतं अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा अपघात झाला की घातपात झाला की अन्य काही  कारणाने त्याचा मृत्यू झाला याचा आता पोलीस दतपास करत आहेत.

बेलापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून रविंद्रच्या घरच्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आणि रविंद्रच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी पोलीस आता मोरे कुटुंबाची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर यात स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी करण्यात येणार आहे.

रविंद्रचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आला कसा याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार आहे. दरम्यान, घरातील तरुणाला अशा पद्धतीने गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

VIDEO : हे तर धनंजय मुंडेंचं अज्ञान, चंद्रकांत पाटील भडकले

First published: June 18, 2019, 5:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading