मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धक्कादायक! शिर्डीमध्ये आईसह 3 मुलांना विषबाधा, चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू

धक्कादायक! शिर्डीमध्ये आईसह 3 मुलांना विषबाधा, चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाली पण यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर आई आणि एका मुलीवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाली पण यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर आई आणि एका मुलीवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाली पण यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर आई आणि एका मुलीवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar

शिर्डी, 10 डिसेंबर : शिर्डीत विषबाधेमुळे लहान बहिण आणि भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेरातील आंबेडकरनगरमध्ये हा प्रकार उघडकिस आला आहे. एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाली पण यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर आई आणि एका मुलीवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आंबेडकरनगरमध्ये राहणाऱ्या सुपेकर कुटुंबियांच्या घरी चार जणांना गुरूवारी जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दिपक सुपेकर यांच्या पत्नीसह तीन मुलांना विषबाधा झाली. यात उपचारादरम्यान मुलगी श्रावणी वय (9 वर्षे) आणि मुलगा कृष्णा (वय 6 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर वैष्णवी नावाच्या 13 वर्षांच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सगळ्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमकं कारण समेल असं पोलिसांनी म्हटलं आहे. तर अधिक तपास करण्यासाठी सुपेकर यांच्या घराचा तपास घेण्यात येणार असून जेवणाचीही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

इतर बातम्या - मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारची ट्रकला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू तर 2 गंभीर

दरम्यान, अशा प्रकारे घरातील चिमुकल्यांना गमावल्यामुळे सुपेकर कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यामध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्येही विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या 60 भाविकांना विषबाधा झाली होती. सर्व भाविक रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील होते. पंढरपूर येथील नगरपरिषदेच्या रुग्णालयात सगळ्यांवर उपचार सुरू होते. या भाविकांमध्ये वयोवृद्धांचा देखील समावेश होता.

संगमेश्वर येथील भाविक कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आले होते. ते धुंडा महाराज मठा शेजारी इनामदार वाड्यात थांबले होते. एकादशी असल्यामुळे उपवासाचे पदार्थ खाल्ले होते. रात्री अडीच वाजेच्या सुमारास 60 भाविकांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्या सर्व भाविकांना नगरपरिषदेच्या संसर्गजन्य रुग्णालय उपचारासाठी दाखल केलं होतं.

First published:

Tags: Shirdi