ड्रेनेजमधील पाण्याचा उपसा करणे जीवावर बेतले; शिर्डीतील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

ड्रेनेजमधील पाण्याचा उपसा करणे जीवावर बेतले; शिर्डीतील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

शेतीसाठी ड्रेनेजमधील पाण्याच उपसा करताना दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी शिर्डीतील कालिका नगरात घडली. गंगाधर गाडेकर आणि संदीप कोते अशी त्यांची नावे आहेत.

  • Share this:

शिर्डी, 10 नोव्हेंबर - शेतीसाठी ड्रेनेजमधील पाण्याच उपसा करताना दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी शिर्डीतील कालिका नगरात घडली. गंगाधर गाडेकर (वय 42) आणि संदीप कोते (वय 48) अशी या मृत पावलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचाठी नगर पालीकेला अपयश आल्याने, अखेरीस साईबाब संस्थानच्या पथकाला पुढाकार घ्यावा लागला.

यापूर्वीही शिर्डीमध्ये अशाप्रकारची घटना घडली आहे. शेतीला पाणी देण्यासाठी सर्सास नगर पालिकेच्या ड्रेनेजमधून पाण्याचा उपसा केला जातो. शिर्डीतले रहिवासी गंगाधर गाडेकर आणि संदीप कोते यांची कालिका नगर भागात उस शेती आहे. पाणी टंचाई असल्यामुळे शेतकरी नगरपालिकेच्या ड्रेनेजमध्ये पंप टाकून पाणी उपसतात आणी शेतीला देतात. शनिवारी गंगाधर गाडेकर आणि संदीप कोते हे पाणी उपसण्यासाठी ड्रेनेजमध्ये उतरले, त्यावेळी त्यांचा गुदमरून दुर्देवी मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, पोलीस अधीक तपास करीत आहेत.

सांडपाणी वाहून नेण्यासाठी शिर्डी नगर पालिकेने भूमीगत ड्रेनेज व्यवस्था केली आहे. मात्र, त्यातून वाहणारे पाणी उभ्या पिकांना देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असते. त्यासाठी चेंबरमध्ये उतरून पंपाद्वारे पाणी उपसलं जातं. त्यात उतल्याने गुदमरूम मृत्यू झाल्याच्या यापूर्वीही घटना घटल्या आहेत. त्यातून बोध घेण्याएवजी सर्रास पाणी उपसा केला जातो. अशा पद्धतीने ड्रेनेजमधून पाणी उपसा करणाऱ्यांवर नगर पालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याचं वास्तव समोर आलंय.

नागरीकांनी त्यांना बाहेर काढले आणी साईबाबा सुपर स्पेशालीटी हाॅस्पीटलमध्ये दाखल केलं मात्र उपचारापुर्वीच दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे संदिप कोते याचा गुरूवारीच वाढदिवस होता आणी आज त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परीवारावर शोककळा पसरलीय. गेल्यावर्षी देखील अशाच प्रकारे चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता त्यानंतर आजही तशाच पद्धतीने या दोन शेतकर्यांना आपला जिव गमवावा लागलाय.

 VIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला

First published: November 10, 2018, 10:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading