युतीतील वाद, शिर्डीतील शिवसेनेच्या बैठकीत मोठा गोंधळ

युतीतील वाद, शिर्डीतील शिवसेनेच्या बैठकीत मोठा गोंधळ

शिर्डी मतदारसंघात शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे तर काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे मैदानात आहेत.

  • Share this:

शिर्डी, 2 एप्रिल : शिर्डी लोकसभा मतदारसंघात संगमनेर इथं आज भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या निवडणूक नियोजन बैठकीत शिवसैनिकांनी मोठा गोंधळ घातला. भाजपा युतीधर्म पाळत नसल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी हा गोंधळ घातला आहे.

युती झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर भेटीगाठींनाही सुरूवात केली आहे. भाऊसाहेब वाकचौरेंची उमेदवारी ही युतीशी गद्दारी असून वाकचौरेंना रोखण्याचं आवाहन शिवसैनिकांनी केलं आहे.

बैठकीदरम्यान शिवसैनिकांनी गोंधळ घातल्यानंतर भाजप गद्दारी करणार नाही, असं म्हणत दादा भुसे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, शिर्डी मतदारसंघात शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे तर काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे मैदानात आहेत. या मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. एकीकडे भाजपच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी बंड केलं आहे. तर दुसरीकडे शिर्डीतील विखे समर्थकांनी काँग्रेसला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानाआधी नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO: परत त्याने त्रास दिला तर मी बघतोच त्याला; नांगरे पाटलांनी घडवली माय-लेकरांची भेट

First published: April 2, 2019, 4:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading