मुंबईच्या समुद्रात फ्लोटिंग हॉटेल बुडालं, सुरक्षेची ऐशीतैशी?

मुंबईतल्या वांद्रे इथल्या समुद्र किनाऱ्यावर असलेलं एक फ्लोटिंग हॉटेल शुक्रवारी समुद्रात बुडालं. घटना घडली त्या वेळी हॉटेलवर 15 कर्मचारी उपस्थित होते. त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 25, 2018 09:03 PM IST

मुंबईच्या समुद्रात फ्लोटिंग हॉटेल बुडालं, सुरक्षेची ऐशीतैशी?

अक्षय कुडकिलवार,मुंबई,ता.25 मे: मुंबईतल्या वांद्रे इथल्या समुद्र किनाऱ्यावर असलेलं एक फ्लोटिंग हॉटेल शुक्रवारी समुद्रात बुडालं. घटना घडली त्या वेळी हॉटेलवर 15 कर्मचारी उपस्थित होते. त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर हे फ्लोटिंग हॉटेल्स सुरू करण्यात आले होते. अशी तीन हॉटेल्स सध्या मुंबईत आहेत. 'आर्क टेक' असं या हॉटेलचं नाव आहे. आज दुपारी किनाऱ्याच्या जवळ असलेलं हे हॉटेल अचानक बुडायला लागलं तेव्हा स्थानिक बोटी आणि जिवरक्षकांनी बोटीवरच्या सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं.

या घटनेमुळं फ्लोटिंग हॉटेलच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या हॉटेलच्या मालकानं सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या का? या फ्लोटिंग हॉटेलला सर्व परवानग्या मिळाल्या आहेत का? मिळाल्या नसतील तर समुद्रात हॉटेल उतरवण्याची परवानगी कशी मिळाली? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2018 08:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...