चिकनचा तुकडा खाताना झाला मृत्यू, घटना ऐकून तुम्हीही हडबडाल!

चिकनचा तुकडा घशात अडकल्यामुळे त्यांना त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शिमलामध्ये आयजीएससी रुग्णालयात भरती करण्यात आलं.

News18 Lokmat | Updated On: May 18, 2019 01:33 PM IST

चिकनचा तुकडा खाताना झाला मृत्यू, घटना ऐकून तुम्हीही हडबडाल!

हिमाचल प्रदेश, 18 मे : चिकन खाण्याचे तर सगळेच शौकिन असतात. पण चिकन खाताने एक अशी घटना घडली की व्यक्तीला आपले प्राण गमावण्याची वेळ आली. चिकनचा तुकडा घशात अडकल्याने शाळेतील शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना हिमाचल प्रदेशमध्ये समोर आली आहे.

हिमाचल प्रदेशमधील राजधानी ब्लूलियामध्ये या प्रकार घडला आहे. 36 वर्षाचे कुमार सिंह हे गेल्या 3 वर्षांपासून महाविद्यालयात शिपायाचं काम करतात. गुरुवारी रात्री घरी आल्यानंतर ते जेवले. त्यावेळी त्यांनी चिकन खाल्लं. खाताना चिकनचा तुकडा घशामध्ये अडकला.

चिकनचा तुकडा घशात अडकल्यामुळे त्यांना त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शिमलामध्ये आयजीएससी रुग्णालयात भरती करण्यात आलं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर कुमार यांना मृत घोषित करण्यात आलं. अन्ननलिकेमध्ये चिकनचा तुकडा अडकल्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

या प्रकाराची माहिती पोलिसांत देण्यात आली असून पोलीस आता अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 मे रोजी कुमार यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यांच्यासाठी घरी चिकन बनवण्यात आलं होतं. त्यावेळी जेवताना हा सगळा प्रकार झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रिपोर्ट कुमार यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. तर कुमार यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबार दुखाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेवर शोक व्यक्त केला जात आहे.

Loading...

त्यामुळे तुम्ही जर नेहमी चिकन खात असाल तर असा काही प्रकार घडणार नाही याची काळजी नक्की घ्या. कारण आजकाल मरणार निम्मित लागत नाही असं म्हणतात.


एका पाठोपाठ 4 जणांनी झाडल्या गोळ्या, हत्येचा थरार CCTV मध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2019 01:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...