शिल्पाला चढली भांग, अचानक करायला लागली नागिन डान्स

शिल्पाला चढली भांग, अचानक करायला लागली नागिन डान्स

शिल्पाची बहीण शमिता शेट्टीही या पार्टीत उपस्थित होती. राजने होळीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले

  • Share this:

मुंबई, २१ मार्च- शिल्पा शेट्टी अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे. मात्र छोट्या पडद्यावर ती सातत्याने दिसते. सध्या ती 'सुपर डान्सर चॅप्टर ३' शोची परीक्षक आहे. या रिअॅलिटी शोमध्ये तिच्यासोबत गीता कपूर आणि अनुराग बासूही या शोचे परीक्षक आहेत. या शोच्या सेटवर तिघंही प्रशिक्षक धम्माल मस्ती करताना दिसत असतात. आता मजा मस्तीचा उत्सव होळी आल्यावर ती शांत तरी कशी बसेल.

दरवर्षी होळीला शिल्पाच्या घरी पार्टीचं आयोजन केलं जातं. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी तिच्या घरी खास होळी खेळायला येतात. यावेळी शिल्पा रंगांची होळीही खेळते. गेल्या वर्षी शिल्पाचा होळी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

शिल्पाचा नवरा राज कुंद्राने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंवरून तो व्हिडिओ शेअर केला होता. यात शिल्पा भांगेच्या नशेत मैत्रीण रोहिणी अय्यरसोबत नागिन डान्स करताना दिसते. हा व्हिडिओ शेअर करताना राजने लिहिले की, ‘दोन घोट भांगेचा हा परिणाम आहे.’


२०१७ मध्ये शिल्पाने मित्र- परिवारासोबत खंडाळा येथील तिच्या फार्महाऊसवर होळीची पार्टी ठेवली होती. शिल्पाची बहीण शमिता शेट्टीही या पार्टीत उपस्थित होती. राजने होळीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. शिल्पाने २००९ मध्ये राज कुंद्राशी लग्न केलं. राजने शिल्पासाठी त्याची पहिली पत्नी कविता कुंद्राला घटस्फोट दिला होता. राज आणि शिल्पाला विवान नावाचा मुलगाही आहे.

VIDEO: दुष्काळी परिस्थितीशी झगडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मी सदैव पाठिशी - खोतकर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 07:14 PM IST

ताज्या बातम्या