शाहरुखच्या 'झीरो' विरोधात कोर्टात याचिका दाखल

शाहरुखच्या 'झीरो' विरोधात कोर्टात याचिका दाखल

शाहरुख खानचा आगामी सिनेमा झीरो विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकेत केला गेलाय.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर : शाहरूख खानचा आगामी सिनेमा झीरो विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका  दाखल करण्यात आलीय. शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकेत केला गेलाय.अमृतपाल सिंह खालसा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. सेन्साॅर बोर्डाला निर्देश देऊन आक्षेपार्ह दृश्य सिनेमातून काढून टाकण्याचे निर्देश देण्याची हायकोर्टाकडे मागणी केलीय.


त्यांचं म्हणणं असं की, पोस्टरवर शाहरुखनं नोटांचा हार घातलाय आणि कृपाण अडकवलंय. कृपाण शिखांचं धार्मिक चिन्ह आहे. त्याची मस्करी केल्याची भावना त्यांच्यात आहे. डीएसजीपीसीच्या धर्म प्रचार कमिटीचे चेअरमन परमजीत सिंह राणा यांनी पत्रात लिहिलंय, ' शाहरुख खानचं पोस्टर समोर आलंय. त्यात त्याच्या गळ्यात कृपाण आहे. ही मस्करी केलेली दिसतेय.'


चित्रपटाचा पहिला टीझर पाहिला तर ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’ हीच म्हण आठवते. आता बादशाह शाहरुख शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे असं म्हणायला हरकत नाही. अमिताभ यांनी 'पा' चित्रपटात वेगळा लूक केला होता. आता शाहरुखही 'झिरो' चित्रपटातून वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


सलमान आणि शाहरुख ही बॉलिवूडची करण- अर्जुन जोडी या सिनेमात दिसणार आहे. निर्मात्यांनी ही युएसपी जाणत सिनेमाच्या टीझरची सुरूवातच दोघांच्या दमदार एण्ट्रीपासून केली. वर्षभरापासून प्रश्नात पाडणाऱ्या टीझरपेक्षा चित्रपटाच्या पोस्टरने आणखी उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटात शाहरुखने बवुआ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सध्या बवुआचे अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहेत. फोटोप्रमाणेच चित्रपटातील अनेक वाक्य चाहत्यांच्या तोंडी आहेत. त्यातीलच एक ‘ब से बवुआ आ राहा है’ हे वाक्य तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक करतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 01:08 PM IST

ताज्या बातम्या