S M L

मुंबई पोलिसांच्या सुचनेनंतरही शिबानी दांडेकरने केलं किकी चॅलेंज

मुंबई पोलिसांनी अनेक वेळा सुचना दिल्यानंतरही किकी चॅलेंजचं वेड काही जात नाही आहे.

Updated On: Aug 23, 2018 07:47 PM IST

मुंबई पोलिसांच्या सुचनेनंतरही शिबानी दांडेकरने केलं किकी चॅलेंज

मुंबई, 22 ऑगस्ट : इंटरनेटवर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं आणि मग काय जे काही व्हायरल होत लोक त्याला कॉपी करायला सुरूवात करतात. मुंबई पोलिसांनी अनेक वेळा सुचना दिल्यानंतरही किकी चॅलेंजचं वेड काही जात नाही आहे. यात आता बॉलिवूड स्टारही उतरले आहेत. पोलिसांच्या लाख सांगण्यावरही अभिनेत्री शिबानी दांडेकरने हिने किकी चॅलेंजच्या गाण्यावर डान्स करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शिबानी दांडेकरने किकी चॅलेंजवर केला डान्स

भारतीय गायक, मॉडल, अभिनेत्री आणि एक अँकर शिबानी दांडेकर सध्या किकी चॅलेंजमुळे चर्चेत आहे. खरंतर तिने कारमधुन खाली उतरत किकी गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिची बहिणही डान्स करत आहे. शिबानीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Loading...

#SHIBONICA #THEEPICKIKIFAIL had to get in the game with my boo though @monicadogra.. when in LA ✌🏾 #thatbrowngirl #dmoney shot by @danielkpictures car driven by @cyfi444

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

मुंबई पोलिसांनी किकी चॅलेंज न करण्याचा सल्ला दिला होता

जसजसा किकी चॅलेंजचा ट्रेंड वाढत गेला तसं आपल्या जीवाचा खेळ करत असे चॅलेंज करू नका अशी सुचना मुंबई पोलिसांनी दिली होती. पण त्यांनी दिलेल्या नियमांना पायदळी तुडवत शिबानीने हा व्हिडिओ शूट केला. त्यामुळे आता नियमांचं पालन नक्की करायचं कोणी असा प्रश्न उपस्थित होतो.

'ROADIES' विजेती श्वेताच्या बोल्ड फोटोजमुळे सोशल मीडियावर राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 07:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close