शेवगाव तालुक्यातील ऊस दराचं आंदोलन मागे, गंगामाई कारखान्याकडून 2525 रुपयांचा दर जाहीर

शेवगाव तालुक्यातील ऊस दराचं आंदोलन मागे, गंगामाई कारखान्याकडून 2525 रुपयांचा दर जाहीर

शेवगाव तालुक्यात गंगामाई खासगी साखर कारखान्याविरोधात पेटलेलं हिंसक आंदोलन अखेर शेतकऱ्यांनी मागे घेतलंय. शेवगावात पार पडलेल्या साखर आयुक्तांसोबतच्या तातडीच्या बैठकीत संबंधीत साखर कारखान्याने उसाला 2525चा एकरकमी भाव देण्याचं मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय.

  • Share this:

15 नोव्हेंबर, अहमदनगर : शेवगाव तालुक्यात गंगामाई खासगी साखर कारखान्याविरोधात पेटलेलं हिंसक आंदोलन अखेर शेतकऱ्यांनी मागे घेतलंय. शेवगावात पार पडलेल्या साखर आयुक्तांसोबतच्या तातडीच्या बैठकीत संबंधीत साखर कारखान्याने उसाला 2525चा एकरकमी भाव देण्याचं मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय.

ऊसाला 3100 रुपये दर द्यावा, यासाठी हे आंदोलन कालपासून सुरू होतं. पण आज सकाळी पोलिसांनी आंदोलक आणि पोलिसांमध्ये गोळीबारावरून उभा संघर्ष पेटल्यानं या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते, शेवगावमध्ये आंदोलकांनी जाळपोळही केली होती तर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडत हवेत गोळीबारही केला होता, त्यात 2 शेतकरी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर हे आंदोलन पेटताच प्रशासनाकडून तातडीची बैठक बोलावण्यात आली होती.

शेवंगाव तहसील कार्यालयातील या बैठकीला प्रांत विक्रम बांदल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र तुपे, शेवगावचे तहसीलदार, साखर उपायुक्त, पोलिस उप अधीक्षक घनश्याम पाटील आणि गंगामाई कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते, या बैठकीत कारखाना संचालकांनी ऊसउत्पादकांना 2525 रुपयांचा एकरकमी भाव देण्याच मान्य केलं. बैलगाडी वाहतूकीसाठीही 25250 रुपये भाव देण्याचा निर्णयाचे घेण्यात आलाय, शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे.

First published: November 15, 2017, 8:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading