मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

9 वर्षांची कॉर्पोरेटची उत्तम नोकरी सोडून तीने स्वीकारलं अजब काम

9 वर्षांची कॉर्पोरेटची उत्तम नोकरी सोडून तीने स्वीकारलं अजब काम

कॉर्पोरेटमधली नोकरी कोणी सहजा सहजी सोडणार नाही. पण 37 वर्षीय महिलेनं नोकरी सोडून हे काम मोठ्या आनंदाने स्वीकारलं आहे.

कॉर्पोरेटमधली नोकरी कोणी सहजा सहजी सोडणार नाही. पण 37 वर्षीय महिलेनं नोकरी सोडून हे काम मोठ्या आनंदाने स्वीकारलं आहे.

कॉर्पोरेटमधली नोकरी कोणी सहजा सहजी सोडणार नाही. पण 37 वर्षीय महिलेनं नोकरी सोडून हे काम मोठ्या आनंदाने स्वीकारलं आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 05 मार्च :उत्तम पद्धतीने सुरु असलेली कॉर्पोरेटमधली नोकरी, दर वर्षी कमी का असेना पण हमखास मिळणारी पगारवाढ, एसी केबिन असं सगळं कोणी सहजा सहजी सोडणार नाही. शिवाय अशी मस्त नोकरी सोडून कोणी फोन आला की पळा, उन्हातून फिरा अशी नोकरी कोण करेल. पण सुरतच्या एका 37 वर्षीय महिलेने हे काम मोठ्या आनंदाने स्विकारलं आहे.

कोण आहे ही महिला?

महिला आता पुरुषांच्या तुलनेत कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत मग ते शिक्षण असो किंवा लढणं. कॉर्पोरेटमध्येतर अनेक महिलांनी सिद्ध केलं आहे. यामध्ये पेप्सिको च्या इंदिरा नूवी यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. पण वाहन चालवणं अर्थात ड्रायव्हिंग हे असं क्षेत्र आहे की सहसा महिला त्याच्या वाटेला जात नाहीत. किंवा ड्रायव्हिंग हे महिलांचं काम नाही, महिला ड्रायव्हिंग नीट करत नाहीत असं अनेकदा बोललं जातं. पण हा समज खोटा ठरवला आहे सूरतच्या ३७ वर्षांच्या हर्षिका पांड्ये या महिलेने. हर्षिकाने महिलांबद्दल असणारे आपल्या समाजातले अनेक गैरसमज खोटे ठरवले आहेत. हर्षिका पांड्ये यांनी फक्त पुरुषी गैरसमज खोटे ठरवले असं नाही तर महिलांच्याबद्दल एक सकारात्मक भूमिका घ्यायला, विचार करायला सुरतच्या समाजाला भाग पाडलं.

हे नक्की वाचा : ‘मी अद्याप जिवंत आहे ते केवळ तिच्यामुळेच’ अभिनेता इरफान खान झाला भावुक

काय करतात हर्षिता पांड्ये?

सूरतला राहणाऱ्या हर्षिका पांड्ये यांनी थोडी थोडकी नाही तर थेट ९ वर्ष कॉर्पोरेटमध्ये नोकरी केली. पत्रकारीतेचं शिक्षण घेतलेल्या हर्षिका यांना नेहमी काही वेगळं करावं असं वाटत होतं. यासाठी त्यांनी सुखाने सुरु असलेली कॉर्पोरेटची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून हर्षिता पांड्ये या जगातील नागरी वाहतुकीची सेवा पुरवणाऱ्या सगळ्यात मोठ्या 'ओला' या कंपनीसोबत काम करत आहेत. ओला कंपनीने जेंव्हा बाईक वरून ग्राहकांना सोडण्याची सेवा करु करण्याचा निर्णय घेतला. 'ओला कंपनीच्या बाईक ग्राहक सेवेत काम केल्यामुळे मोठा आत्मविश्वास मिळाला. इतकंच नाही तर लोकांनी मान-सन्मान सुद्धा दिला.' असं हर्षिता पांड्ये आवर्जून सांगतात.

घरातल्या एकमेव कमावत्या नाहीत

हर्षिका यांनी घरातल्या सगळ्यांचे आवर्जून आभार मानले. त्यांच्या पाठींब्यामुळे आपण हे काम करू शकतो हे देशित हर्षिता सांगतात. हर्षिता या घरात एकमात्र पैसे कमावणाऱ्या नाहीत. तर त्या घरच्यांना सगळ्या प्रकारची मदत सुद्धा करतात. बाईक प्रवासी सेवेमुळे पैसे मिळतातच, पण घराला पुरेसा हातभार लावल्याचं समाधान असल्याचंही त्या सांगतात. 'ओला बाईक प्रवासी सेवा हे काम सोईच्या वेळेनुसार करता येतं. यामुळे वेळप्रसंगी घरातली कामं पूर्ण करून किंवा त्यांना न्याय देऊन ही हे काम करू शकते ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.' असंही हर्षिता पांड्ये यांचं म्हणणं आहे. आपले बरेचसे ग्राहक हे विद्यार्थी असतात. ज्यांना वेळेत घरी किंवा कॉलेजला पोहोचायचं असतं. या कामामुळे समाधान मिळतं आणि पैसे सुद्धा असं हर्षिता सांगतात. हर्षिता पांड्ये यांना त्यांच्या कामासाठी न्यूज18 लोकमतकडून शुभेच्छा...

हे नक्की पाहा : मन हेलावून टाकणारी ती 13 मिनिटं, काजोलचा हा VIDEO एकदा पाहाच

First published:

Tags: Career