मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /धक्कादायक! प्रियकराचा बदला घेण्यासाठी ‘तिनं’ रचला बलात्काराचा बनाव; पोलिसांनी उलगडलं रहस्य

धक्कादायक! प्रियकराचा बदला घेण्यासाठी ‘तिनं’ रचला बलात्काराचा बनाव; पोलिसांनी उलगडलं रहस्य

 अनेकदा प्रेमात मिळालेला नकार, अपयश यानं दुखावलेल्या व्यक्ती सूडाच्या भावनेनं पेटून उठतात आणि नको ती गोष्ट करून स्वतःसह कुटुंबालाही अडचणीत आणतात.

अनेकदा प्रेमात मिळालेला नकार, अपयश यानं दुखावलेल्या व्यक्ती सूडाच्या भावनेनं पेटून उठतात आणि नको ती गोष्ट करून स्वतःसह कुटुंबालाही अडचणीत आणतात.

अनेकदा प्रेमात मिळालेला नकार, अपयश यानं दुखावलेल्या व्यक्ती सूडाच्या भावनेनं पेटून उठतात आणि नको ती गोष्ट करून स्वतःसह कुटुंबालाही अडचणीत आणतात.

  हैदराबाद, 20 ऑगस्ट : प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं, असं म्हणतात. प्रेम मिळवण्यासाठी काही लोक काहीही करायला तयार असतात. आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला राजी करण्यासाठी कोणतंही टोक गाठणारेही लोक असतात, मात्र त्यांच्या अशा वागण्यानं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. अनेकदा प्रेमात मिळालेला नकार, अपयश यानं दुखावलेल्या व्यक्ती सूडाच्या भावनेनं पेटून उठतात आणि नको ती गोष्ट करून स्वतःसह कुटुंबालाही अडचणीत आणतात.

  अनेकदा आपण एकतर्फी प्रेमातून किंवा प्रेम असूनही काही कारणानं नकार दिलेल्या व्यक्तीवर हल्ला केल्याच्या घटना ऐकतो. बहुतांश वेळा महिलेवर पुरुषानं हल्ला करण्याच्या घटना अधिक असल्याचं दिसून येतं, मात्र एखादी स्त्रीही टोकाला जात भयंकर कृत्य करू शकते याचं एक उदाहरण हैद्राबादमधील (Hyderabad) एका घटनेनं समोर आलं आहे. प्रेमात फसवणूक झाल्यानं सूडानं पेटून उठलेल्या एका तरुणीनं आपल्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी असं पाऊल उचललं की, त्यानं सगळेच हादरून गेले. न्यू इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  हैद्राबादमधील एका लॅब टेक्निशियन (Lab Technician) म्हणून काम करणाऱ्या मुलीनं स्वतःवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याचं तिच्या आई-वडीलांना सांगितलं. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत मंगळवारी संध्याकाळी याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याची दखल घेत तत्काळ तपास सुरू केला. पोलिस तपासादरम्यान काहीतरी वेगळचं चित्र समोर आलं आणि या घटनेला नाट्यमय वळण मिळालं.

  हे ही वाचा-सहाव्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होते माजी मंत्री; पत्नीनेच घडवली तुरुंगवारी

  या मुलीने आपल्या आई-वडीलांना सांगितलं होतं की, मंगळवारी संध्याकाळी काम संपल्यानंतर चंद्रयानगुट्टा भागातील फिसाल बांदा (Phisal Banda) इथं असलेल्या तिच्या घरी येण्यासाठी तिनं संतोष नगरमध्ये (Santosh Nagar) ऑटो पकडली. त्यावेळी रिक्षात दोन पुरुष बसलेले होते. काही अंतर गेल्यानंतर ती अर्धवट बेशुध्द झाली. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन ऑटो चालक आणि इतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यात तिनी त्या प्रियकरालाही गोवलं होतं. हे ऐकून तिच्या आई-वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

  पोलिसांनी तपासादरम्यान तिनं सांगितलेल्या संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजही (CCTV Footage) तपासले. पण त्यात कुठंही तिचं अपहरण झाल्याचे पुरावे मिळाले नाहीत. या मुलीकडे घटनेची चौकशी करत असताना पोलिसांना तिच्या सांगण्यात विसंगती आढळली, त्यामुळं त्यांचा तिच्यावरचा संशय बळावला. तेव्हा त्यांनी पोलिसी खाक्या दाखवत चौकशी करताच सगळं सत्य बाहेर आलं आणि या मुलीचं बिंग फुटलं. नंतर आलेल्या तिच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालातही तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचंही स्पष्ट झालं.

  आपल्या प्रियकरानं (Boyfriend) दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केल्यानं या मुलीला त्याचा प्रचंड राग आला होता. त्यामुळं त्याला धडा शिकवण्यासाठी त्याचा बदला (Revenge) घेण्यासाठी तिनं ही बलात्काराची खोटी कहाणी तयार केल्याचं पोलिस तपासात उघड झालं. प्रेम केलेल्या व्यक्तीबद्दल सूडाची भावना बाळगून स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता असं टोकाचं पाऊल उचलणाऱ्या या मुलीच्या वर्तनाची सर्वत्र चर्चा होत आहे.

  First published:

  Tags: Hyderabad, Love, Rape