‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने दिल्लीला परतावं- शत्रूघ्न सिन्हा

‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने दिल्लीला परतावं- शत्रूघ्न सिन्हा

''सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये आणि लांबलचक आश्वासनं संपली असतील तर, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने गुजरात सोडून दिल्लीला परत यावं, ''

  • Share this:

14 डिसेंबर, नवी दिल्ली : भाजपचे नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष नेतृत्वावर उपहासात्मक टीका केलीय. त्यांनी मोदी - शहा यांना ''वन मॅन शो आणि 2 मॅन आर्मी'' अशी शेलकी विशेषणं लावत त्यांना परत दिल्लीत परतण्याचं आवाहन केलंय. शत्रूघ्न सिन्हा आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ''सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये आणि लांबलचक आश्वासनं संपली असतील तर, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने गुजरात सोडून दिल्लीला परत यावं, ''

शत्रूघ्न सिन्हा फक्त एवढेच ट्विट करून थांबले नाहीत. आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये ते लिहितात, '' जर आपण विजयी झालो तर आम्हाला माहीत आहे की, याचे सर्व श्रेय तुम्हालाच मिळेल. पण जर पराभव झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? एक जुनी म्हण आहे, ‘टाळी कर्णधाराला तर शिवीही कर्णधारालाच’. मी देवाकडे प्रार्थना करतो आणि मला अपेक्षाही आहे की, गुजरात निवडणुकीत आम्हाला टाळीच मिळो. जय हिंद.’

शत्रूघ्न सिन्हा हे अडवानी गटाचे खासदार मानले जातात. भाजपचा कारभार मोदी-शहांच्या हाती गेल्यापासून ते सातत्याने पक्षनेतृत्वावर टीका करताहेत. आजही त्यांनी गुजरात निवडणुकीचं निमित्त साधून पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्यं केलंय. ते बिहारमधील पाटणासाहिब मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत.

 

First published: December 14, 2017, 6:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading