मुंबई, २२ जानेवारी २०१९- जगभरात शाहरुख खानचे असंख्य चाहते आहेत. मुंबईत त्याच्या मन्नत बंगल्या बाहेर दररोज हजारो चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी तासन् तास वाट पाहत असतात. पण या सगळ्यात तुम्हाला बॉलिवूडच्या बादशहचं एक मंदिरही आहे हे माहिती होतं का?
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी याचसंदर्भात एक ट्विट केलं आहे. ते केरळ येथील मुन्नार दौऱ्यावर असताना थरूर यांना असं काही दिसलं की त्यासंदर्भात त्यांना ट्विट करावच लागलं. २०१३ मध्ये आलेल्या चेन्नई एक्सप्रेस सिनेमात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमाचा काही भाग मुन्नारमध्ये चित्रीत करण्यात आला आहे.
चित्रीकरणावेळी शाहरुख आणि दीपिका ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. आता या हॉटेलने ही रूम शाहरुखला समर्पित केली आहे. ट्विटरवर या रूमचे फोटो शेअर करताना शशी थरूर यांनी स्पष्ट केले की, या रुमच्या भिंती चेन्नई एक्सप्रेसच्या पोस्टर्सनी सजवल्या आहेत.
Dear @iamsrk, when on a brief visit to Munnar yesterday I took rest in the room you occupied in 2013, which has been converted into a shrine for you & #ChennaiExpress! Every wall is decorated w/posters of the film &the suite is dominated by this cut-out of you. No place for rest! pic.twitter.com/hFUYCgXLEc
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 21, 2019
एवढंच नाही तर या रूममध्ये शाहरुखचं कटआऊटही ठेवण्यात आलं आहे. हे कटआऊट रूमच्या मधोमध ठेवण्यात आलं आहे.
थरूर यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘कुठेही आराम करायची जागा नाही. प्रिय शाहरुख काल मुन्नारच्या प्रवासात मी ती रूम घेतली जिथे तुम्ही २०१३ मध्ये राहिला होतात. आता या रूमला मंदिराचं स्वरुप आलेलं आहे. प्रत्येक भिंतीवर चेन्नई एक्सप्रेसचे पोस्टर आहेत आणि ही खोली तुमच्या मोठ्या कटआऊटने सजलेली आहे. आराम करायला जागा नाही.
'मला विकू नका' : डोळ्यात पाणी आणणारा दुष्काळी भागातला Ground Report