News18 Lokmat

सुनंदा पुष्कर आत्महत्याप्रकरण : शशी थरूर यांच्यावर संशय, दिल्ली पोलिसांचं आरोपपत्र

सुनंदा पुष्कर आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यात सुनंदा यांचे पत्नी आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना आरोपी करण्यात आलं आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 14, 2018 06:44 PM IST

सुनंदा पुष्कर आत्महत्याप्रकरण : शशी थरूर यांच्यावर संशय, दिल्ली पोलिसांचं आरोपपत्र

नवी दिल्ली,ता.14 मे : सुनंदा पुष्कर आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यात सुनंदा यांचे पत्नी आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना आरोपी करण्यात आलं आहे. सुनंदा यांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. चार वर्षानंतर पोलीसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावर शशी थरूर यांनी संशय व्यक्त केला आहे.

दिल्ली पोलीसांनी सोमवारी 3 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यात कलम 306 आणि 498 (अ) नुसार शशी थरूर यांच्यावर सुनंदा यांना आत्महत्येसाठी भाग पाडल्याचा आरोप ठेवण्यात आला. 2014 च्या जानेवारीत सुनंदा पुष्कर या नवी दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलात मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांनी आत्महत्या केल्याचं नंतर स्पष्ट झालं. या प्रकरणाची पुढची सुनावणी 24 मे रोजी होणार आहे.

शशी थरूर यांनी दोन ट्विट करून आपलं स्पष्टकरण दिलंय. सुनंदाही केवळ माझ्यामुळं आत्महत्या करणारी नव्हती. साडे चार वर्षांच्या चौकशीनंतर पोलिसांनी हा आरोप ठेवल्यानं मला संशय पोलिसांच्या हेतूवर संशय आहे. 17 ऑक्टोंबरला कायदा अधिकाऱ्याने या प्रकरणी शशी थरूर यांच्या विरोधात पुरावा नसल्याचं दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं होतं. आणि सहा महिन्यानंतर संशय असल्याचं सांगितलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2018 06:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...