Home /News /news /

मुंबई शेअर बाजार कोसळला, तब्बल 1000 अंकांची घसरण !

मुंबई शेअर बाजार कोसळला, तब्बल 1000 अंकांची घसरण !

मुंबई शेअर बाजारात तब्बल 1000 अकांची निच्चांकी घसरण झालीय. गेल्या दोन वर्षांमधली सर्वात मोठी घसरण आहे. सकाळी सव्वा नऊच्या वेळी तर हीच घसरण तब्बल 1183 अंकांपर्यंत खाली आली होती पण नंतर बाजार थोडासा सावरला. तिकडे निफ्टीमध्येही 371 अंकांची घसरण झालीय.

पुढे वाचा ...
06 फेब्रुवारी, मुंबई : मुंबई शेअर बाजारात तब्बल 1000 अकांची निच्चांकी घसरण झालीय. गेल्या दोन वर्षांमधली सर्वात मोठी घसरण आहे. सकाळी सव्वा नऊच्या वेळी तर हीच घसरण तब्बल 1183 अंकांपर्यंत खाली आली होती पण नंतर बाजार थोडासा सावरला. तिकडे निफ्टीमध्येही 371 अंकांची घसरण झालीय. अमेरिकन शेअर बाजारात आलेल्या विक्रमी पडझडीचे परिणाम जगभरातल्या बाजारात बघायला मिळत आहेत. भारतीय वेळेनुसार काल रात्री डाऊजोन्स निर्देशांक 4.6 टक्के अर्थात 1600 अंकांनी कोसळून 24 हजार 345 वर बंद झाला. त्यानंतर आज सकाळी उघडलेला जपानची राजधानी टोकियोच्या शेअर बाजारातही विक्रमी पडझड झालीय. खरंतर जेटलींनी बजेट सादर केल्यापासूनच शेअर बाजारात पडझड सुरू झाली होती. सोमवारी देखील 500 अंकानी शेअर बाजार कोसळला होता. पण आज मात्र, हाच पडझडीचा आकडा तब्बल 1000 अंकांच्या खाली आलाय. बजेट वरील प्रतिक्रिया आणि अमेरिकन शेअर बाजारातील मोठी घसरण ही दोन मोठी कारणं या पडझडीसाठी सांगितली जातात. अमेरिका शेअर बाजारातही 7 टक्क्यांची घसरण झालीय. पुढच्या वर्षभरातही शेअर बाजारातली ही अनिश्चितता कायम राहणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातल्या जाणकारांनी वर्तवलाय.
First published:

Tags: Share market, अमेरिका, बजेट, मोदी, शेअर बाजार

पुढील बातम्या