शेतकरी कर्जमाफी आवश्यकच ; पवारांनी घेतली मोदींची भेट

शेतकरी कर्जमाफी आवश्यकच ; पवारांनी घेतली मोदींची भेट

राज्यातल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.

  • Share this:

06 जून : राज्यातल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत शरद पवारांनी राज्यात शेतकरी कर्जमाफीची मागणी केलीये.

राज्यात शेतकरी आंदोलनाचा जोर असताना शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. हा संप राजकीय नाही. ज्या प्रकारे उत्तरप्रदेशमध्ये कर्जमाफीची घोषणा केली तशी घोषणा राज्यात करावी. आज शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे कर्जमाफी आवश्यक आहे अशी मागणी पवारांनी मोदींकडे केली.

तर पवारांच्या या मागणीला मोदींनी उत्तर दिलं. उत्तरप्रदेशसाठी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. ते इतर राज्यांना दिलं नव्हतं. महाराष्ट्रात कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकार घेईल असं मोदींनी सांगितल्याचं कळतंय.

'शेतकरी संपाला आमचा पाठिंबा'

दोन वर्षांपूर्वी भाजप ज्या मुद्यांसाठी आंदोलन करत होते, आज शेतकरी त्याच मागण्या करत आहेत. शेतकरी संपात राजकीय पक्षाची भूमिका नाही, शेतकऱ्यांचा संप उत्स्फूर्त आहे. या संपाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असंही पवारांनी स्पष्ट केलं.

'चंद्रकांत पाटील अज्ञानी'

तर मी कृषिमंत्री असताना पीक कर्जाचा दर 12 वरुन 4 वर आणला. स्वामीनाथन आयोगाच्या निम्या शिफारसी मीच लागू केल्या आहेत  पण चंद्रकांत पाटलांना याबद्दल फारसं काही माहिती नाही. मुळात चंद्रकांत पाटील हे अज्ञानी आहेत. त्यांना समजून सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असा टोलाही पवारांनी लगावला.

(संग्रहित छायाचित्र)

 

First published: June 6, 2017, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading