जळगाव, 16 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेचा तपास एन.आय.ए. कडे देण्यावरून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. एनआयएकडून तपास करणं हा केंद्राचा अधिकार असेल तरीही राज्य सरकारला विश्वासात घ्यायला हवं होतं, असं पवार म्हणाले आहेत. भाजप सरकार असताना भीमा कोरेगावचं प्रकरणं घडलं होतं. यामुळे त्यात गडबड असू शकते असा संशयसुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.