मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Inside Story : धनंजय मुंडेंबद्दल मोठी अपडेट; NCP च्या गोटातून आली बातमी

Inside Story : धनंजय मुंडेंबद्दल मोठी अपडेट; NCP च्या गोटातून आली बातमी

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले, त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले, त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले, त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

मुंबई, 14 जानेवारी: धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंधाची सोशल मीडियावर जाहीरपणे कबुली दिल्यानंतर त्यांच्यापुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे विधिमंडळातले नेते धनंजय मुंडे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटले आणि त्यांच्यात चर्चा झाल्याची बातमी आहे. या भेटीत नेमकं काय ठरलं हे अद्याप जाहीर झालेलं नसलं, तरी मुंडेंपुढच्या अडचणी वाढणार, असं राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून समजतं. कालपर्यंत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे प्रकरणी हात वर करत होते आणि तो त्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक मामला असल्याचं सांगत होते. तेच आज सकाळपासून मात्र मुंडेंवरचे आरोप गंभीर असल्याचं सांगत आहेत. 24 तासांत अशी काय चित्रं फिरली की धनंजय मुंडे यांचे विवाहबाह्य संबंध पक्षाला गंभीर दखल घेण्यासारखे वाटू लागले? नेमकं काय आहे प्रकरण? धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतल्या एका महिलेने बलात्काराचे आरोप केले, त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तिने सोशल मीडियावर पोलीस बलात्काराची तक्रार नोंदवून घेत नाहीत, असं जाहीर केलं आणि या प्रकरणाची दखल माध्यमांमधून घेण्यात आली. बलात्कारासारखा गंभीर आरोप असल्याने राजकीय खळबळ उडाली. दुसऱ्याच दिवशी हे आरोप खोटे आहेत, असं स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याविषयी त्यांची बाजू मांडली. हे स्पष्टीकरण देताना मुंडे यांनी आरोप केलेल्या महिलेच्या बहिणीशी आपले संमतीने झालेले संबंध  होते, हे मान्य केलं. तिच्यापासून आपल्याला एका महिलेपासून  दोन मुलं असल्याचंही मान्य केलं. 2003 पासून ते त्या महिलेच्या संपर्कात होते आणि आता ती त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. या प्रकरणी कोर्टात दावा दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली. एवढंच नाही तर मुलांना रीतसर माझं नावही दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीची भूमिका काय ? मुंडेंच्या या स्पष्टीकरणानंतर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाने उचलून धरली. निवडणूक आयोगाला आणि जनतेला खोटी माहिती दिली असल्याने त्यांची आमदारकी संपुष्टात आणावी, असंही सांगण्यात येत आहे. म्हणूनच यावर राष्ट्रवादीची भूमिका काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंडे आणि पवार भेटीत नेमकी चर्चा काय झाली हे बाहेर आलेलं नाही, पण मुंडेंवरचा दबाव वाढल्याचं सांगितलं जातं. निवडणुकीसाठी (election) उमेदवार निवडणूक आयोगाकडे आपापली वैयक्तिक माहिती, मालमत्ता, व्यवसाय अशी सर्व माहिती प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून देत असतो. यात दिलेली माहिती खरी असल्याचंही उमेदवार लिहून देतो. शिवाय आपण कोणतीही बाब लपवत नसल्याचंही त्याला सांगावं लागतं. पण याचा भंग होत असल्याचं आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द होऊ शकते. उमेदवार आमदार, खासदार असल्यास ही सर्व पदं रद्द होऊ शकतात. काही कायदेतज्ज्ञांच्या मते, विवाहबाह्य संबंध असले तर त्याची माहिती निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात देण्याची गरज नसते. त्यापासून त्यांना अपत्य असले तरी आणि त्यांनी अपत्यांना आपले नाव दिले असले तरी नियमानुसार प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख नसल्यास कारवाई होऊ शकत नाही. पण नैतिकदृष्ट्या विवाहबाह्य संबंधांचा मुद्दा मोठा ठरू शकतो आणि त्यामुळेच शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंडेंना आता काय न्याय देत हे पाहावं लागेल. धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणारी ती गायिका कोण आहे? धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेेच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. असे असले तरीही या पोस्टनंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची माहिती या पोस्टमधून समोर आली आहे.  करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो, असं मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी बलात्काराचे आरोप खोडून काढले आहेत. त्यांनी यामध्ये दिलेल्या माहितीनुसार रेणू शर्मा या करुणा शर्मा (Renu Sharma) यांच्या बहिण आहेत.
First published:

Tags: Dhananjay munde, NCP, Sharad pawar

पुढील बातम्या