S M L

शरद पवारांनी इतकंही खोटं बोलू नये,प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

शरद पवारांनी मी खासदार झालो ते त्यांच्या पाठिंब्यानं झालो, असं सांगितलं. पण हे धादांत खोटं आहे,

Updated On: Sep 24, 2018 02:20 PM IST

शरद पवारांनी इतकंही खोटं बोलू नये,प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

मुंबई, 24 सप्टेंबर : शरद पवारांनी मी खासदार झालो ते त्यांच्या पाठिंब्यानं झालो, असं सांगितलं. पण हे धादांत खोटं आहे, पवारांनी एवढंही खोटं बोलू नये अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली शरद पवार यांच्यावर केली.

प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यावर टीका केली. मी जेव्हा खासदार झालो त्यावेळी माझा समझोता त्यावेळचे अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याशी झाला होता. शरद पवार यात कुठेच नव्हते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मला मुरली देवरा म्हणाले पवार यांना भेटायचं आहे, ते राजगृहावर भेटायला आले होते, मी त्यांना म्हणालो होतो की, तुम्ही काँग्रेसशी चर्चा करा. शरद पवारांच्या दाव्यात काहीही तथ्य नाहीये. त्यांच्या यानंतरच्या वक्तव्याला उत्तर देणार नाही. त्यांनी वैयक्तिक पातळीवर उतरू नये असा इशाराही आंबेडकर यांनी दिला.त्यांनी आंबेडकर यांनी राफेल डीलकडे मोर्चा वळवला.

काँग्रेसच्या काळात एका राफेल विमानाची किंमत 712 कोटी रुपये होती, भाजपाने ती 1600 कोटी रुपये केली. अचानक एवढी किंमत कशी वाढली हा प्रश्न आहे. उत्पादन फ्रान्सची कंपनी आणि रिलायन्स करणार, मात्र हे विमान कायम रेडी टू यूज ठेवण्याची किंमत 1 लाख कोटी रुपयांवर जाणार आहे अशी माझी माहिती आहे. सरकारी कंपनी एचएएलला काढून रिलायन्सला हे काम दिले. सरकारने राफेलची रेडी टू यूज किंमत किती असेल हे सांगायला हवे  एचएएलकडे काम दिले असते तर ती किंमत किती असती आणि रिलायन्सला काम दिल्याने किंमत किती आहे हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली.

तसंच दरवर्षी विमान घेतल्यावर रिलायन्सला देखभालीसाठी 1 लाख कोटी द्यावे लागतील. रिलायन्स ही विमान रेडी तू युज अशी ठेवतील याची गॅरंटी कोण देणार?, रिलायन्सकडे टेक्नॉलॉजी नाही, फ्रान्स सरकारने गॅरंटी दिली का की युद्ध झालं तर विमान रेडी टू युज वापरू शकतो? तर असं झालं नाही, हे डील डिफेन्सचा विरोधात आहे अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.

Loading...
Loading...

================================================================

VIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2018 02:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close