शरद पवारांचा सन्मान, पद्मविभूषण प्रदान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्यासह भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनाही याच सन्मानाने गौरवण्यात आलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2017 08:55 PM IST

शरद पवारांचा सन्मान, पद्मविभूषण प्रदान

30 मार्च : देशाच्या सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांचं आज (गुरुवारी) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पद्म पुरस्कारांचा वितरण करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्यासह भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनाही याच सन्मानाने गौरवण्यात आलंय.

दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची नावं जाहीर झाली. त्यानंतर  पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराचं आता राष्ट्रपती भवनात दिमाखात वितरण करण्यात आळं. महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कारने सन्मान करण्यात आलाय. तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही याच सन्मानाने गौरवण्यात आलंय.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुंदरलाल पटवा यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला. त्यासोबतच जमू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद, लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए.संगमा यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आले.

ज्येष्ठ गायक के. जे. येसुदास आणि ज्येष्ठ शास्त्रीय संगीतकार आणि मोहनवीणेमुळे प्रख्यात असलेले शास्त्रीय संगीतकार विश्वमोहन भट यांनाही पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं.

'पद्मविभूषण' पुरस्कार प्रदान

Loading...

    शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

    मुरली मनोहर जोशी, ज्येष्ठ भाजप नेते

    सुंदरलाल पटवा (मरणोत्तर पद्मविभूषण), मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते

    के. जे. येसुदास, ज्येष्ठ गायक

    पं. विश्वमोहन भट, मोहनवीणावादनामुळे जगविख्यात झालेले शास्त्रीय संगीतकार

 

पद्मश्री पुरस्कार  

    विराट कोहली (क्रिकेट)

    साक्षी मलिक महिला (कुस्तीपटू)

    दीपा कर्माकर (जिम्नॅस्ट)

    श्रीजेश (हॉकी)

    विकास गौडा (अॅथलिट)

    भावना सोमय्या (फिल्म समीक्षक)

    सी. नायर (नर्तक)

    अनुराधा पौडवाल (गायिका)

    कैलाश खेर (गायक)

    संजीव कपूर (शेफ)

 

 'पद्मभूषण' पुरस्कार

    चो. रामास्वामी, ज्येष्ठ पत्रकार

    विश्वमोहन भट, मोहनवीणा वादक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2017 08:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...